Shamshera Release on OTT: रणबीर कपूर-संजय दत्तचा 'शमशेरा' ओटीटी वर होणार रिलीज
'शमशेरा' हा बिग बजेट पीरियड-अॅक्शन चित्रपट आहे. रणबीर कपूर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाचं दुहेरी भूमिका साकारत आहे.
Shamshera Release on OTT: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) शेवटी संजय दत्त (Sanjay Dutt) च्या बायोपिक संजूमध्ये दिसला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून चाहते रणबीर कपूरच्या पुढील प्रोजेक्टसह पडद्यावर परतण्याची वाट पाहत आहेत. रणबीर बऱ्याच काळानंतर परतला असला तरी लवकरचं तो यशराज बॅनरच्या 'शमशेरा' (Shamshera) मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 18 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता असं म्हटलं जात आहे की, कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पाहता, चित्रपट निर्मात्यांनी 'शमशेरा' डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. (वाचा - Akshay Kumar चा Bachchan Pandey चित्रपट होळीच्या मुहूर्तावर 'या' दिवशी होणार चित्रपटगृहात प्रदर्शित)
दरम्यान, नुकत्याच आलेल्या एका अहवालात, 'शमशेरा' बद्दल असा दावा करण्यात आला होता की, चित्रपटाचे थिएटरनंतरचे डिजिटल अधिकार अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने विकत घेतले आहेत. म्हणजेच, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट Amazon Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. याशिवाय या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क स्टार नेटवर्कला विकले गेले आहेत. चित्रपटाचे नाट्य आणि संगीत हक्क यशराज फिल्म्सकडे आहेत.
दिग्दर्शक करण मल्होत्राने सांगितले सत्य -
डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'शमशेरा' रिलीज करण्याबाबत बोलताना दिग्दर्शक करण मल्होत्रा म्हणाले की, हा निर्मात्याचा कॉल असेल. रिपोर्टनुसार, करणने आदित्य चोप्राचे कौतुक केले आणि म्हटले की, या सर्व गोष्टी पूर्णपणे निर्मात्याच्या (आदित्य चोप्रा) हातात आहेत. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सक्रिय निर्माता आहे. त्यांना याबद्दल चांगली माहित आहे आणि मी ते पूर्णपणे त्यांच्यावर सोडले आहे.
करण मल्होत्रा यांनी सांगितलं की, मी हा चित्रपट पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीने बनवला आहे. याशिवाय मी चित्रपटाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्वकाही आदित्यवर अवलंबून आहे. त्याला ते कसे ठेवायचे आहे, त्याची योजना काय आहे, सर्वकाही त्याच्या हातात आहे. मी दिग्दर्शक म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे.
याशिवाय करणनेही चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा अशी इच्छाही व्यक्त केली. त्याने पुढे सांगितलं की, शमशेराबद्दल काहीही बोलणे घाईचे आहे, कारण सध्या आपण अशा परिस्थितीत आहोत ज्यामुळे संपूर्ण वातावरण नकारात्मक झाले आहे. आम्ही अद्याप चित्रपटाच्या पीआर झोनमध्ये प्रवेश केलेला नाही, परंतु योग्य वेळ आल्यावर आम्ही याबद्दल नक्कीच बोलू.
'शमशेरा' हा बिग बजेट पीरियड-अॅक्शन चित्रपट आहे. रणबीर कपूर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाचं दुहेरी भूमिका साकारत आहे. यामध्ये तो लुटारू आणि त्याच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा 19 व्या शतकातील आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरशिवाय संजय दत्त, वाणी कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)