Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor स्टारर Luv Ranjan यांच्या चित्रपटाच्या रिलीज डेटची झाली घोषणा

रणबीर कपूर आणि लव्ह रंजन दिग्दर्शित श्रद्धा कपूर अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट होळीच्या निमित्ताने 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Photo Credits: Instagram)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि लव्ह रंजन दिग्दर्शित श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट होळीच्या निमित्ताने 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निर्मात्यांनी ठरवले नाही. परंतु, आज त्याची रिलीज डेट सोशल मीडियावर शेअर केली गेली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करत निर्मात्यांनी सांगितले की, हा चित्रपट पुढील वर्षी होळीच्या निमित्ताने प्रदर्शित होईल.

या अशीर्षकांकित रोम-कॉमचे शूटिंग दिल्लीमध्ये जानेवारी 2021 पासून सुरू झाले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. या शीर्षक नसलेल्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हे नवीन रोमँटिक जोडपे पाहून चाहते उत्साही दिसत आहेत. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूरही दिसणार आहेत. (वाचा - Bhojpuri Actress Monalisa Photos: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने हॉट अंदाजासह शेअर केले ग्लॅमरस फोटो; See Pic)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

'प्यार का पंचनामा' सिरिज आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लव रंजन पहिल्यांदा रणबीर आणि श्रद्धासोबत काम करत आहेत. चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली असून गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी सादर केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif