Ranbir Kapoor and Alia Bhatt Marriage: आलिया भट्टसोबतच्या लग्नाबाबत रणबीर कपूरचा खुलासा, '...तर यावर्षी आमचे लग्न झाले असते.'

मात्र आलिया त्याच्या जीवनात आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून आलिया व रणबीर यांच्या लग्नाबद्दल नेहमीच बातम्या येत राहिल्या. हे जोडपे कधी लग्न करणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले

Ranbir Kapoor and Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय लव्हबर्ड्स पैकी एक आहे. दीपिकासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर नक्की कोणासोबत संसार थाटणार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आलिया त्याच्या जीवनात आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून आलिया व रणबीर यांच्या लग्नाबद्दल नेहमीच बातम्या येत राहिल्या. हे जोडपे कधी लग्न करणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. अशा परिस्थितीत आता रणबीर कपूरने स्वत: आपल्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. आपली यावर्षी लग्न करण्याची इच्छा असल्याचे रणबीरने एका मुलाखतीत उघड केले आहे.

राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरने सांगितले आहे की, त्याला यावर्षी लग्न करायचे होते मात्र कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे ते शक्य झाले नाही. आता याबाबत बोलून रणबीरला या गोष्टीला नजर लावायची नाही. लवकरच आपल्या आयुष्यातील हे लक्ष्य आपण पूर्ण करू असेही त्याने सांगितले. म्हणजेच हे स्पष्ट आहे की रणबीर कपूरचे यावर्षी लग्न करण्याचे पूर्ण नियोजन होते, मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही.

लॉकडाऊनमध्ये काही नवे शिकायला मिळाले का असा प्रश्न विचारला असता, रणबीर म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आलिया भट्ट ओव्हर अ‍ॅचिव्हर आहे. तिने या लॉक डाऊनचा फायदा करून घेत गिटारपासून पटकथालेखना पर्यंत अनेक कोर्सेस पूर्ण केले. पण मी कोणताही कोर्स केला नाही. सुरुवातील काही कौटुंबिक समस्यांचा सामना करीत होतो, त्यानंतर लॉक डाऊनदरम्यान वाचन आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत केला, (हेही वाचा: Siddharth-Mitali Kelvan Photos: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांचंं पहिलं केळवण ईशा केसकरच्या घरी; पहा फोटोज)

दरम्यान, याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी उघडपणे आपल्या नात्याबाबत भाष्य केले नव्हते. पण यावेळी पहिल्यांदाच रणबीर आलिया सोबतच्या नात्याबद्दल उघडपणे बोलला आहे. मात्र दुसरीकडे सोशल मिडियावर हे कपल नेहमीच एकमेकांच्या कुटुंबांसोबत फोटो शेअर करत आले आहेत.