Sunil Lahri Got Angry on Adipurush Dialogues: आदिपुरुष चित्रपटातील डायलॉगवर 'रामायणातील लक्ष्मण' सुनील लाहिरी संतापले; म्हणाले, 'चित्रपटातील भाषेचा वापर अत्यंत लज्जास्पद'
चित्रपटातील काही डायलॉगवर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या चित्रपटाचे संवाद मनोज मुंतशीर यांनी लिहिले असून दिग्दर्शक ओम राऊत यांनी केलं आहे. सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.
Sunil Lahri Got Angry on Adipurush Stars: दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) स्टारर आदिपुरुष हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या लोकांनी चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यादरम्यान रामायण मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीने या चित्रपटाला लज्जास्पद म्हटले आहे.
रामानंद सागर यांच्या रामायणात लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांनी आदिपुरुषवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटातील संवाद आणि कलाकारांबद्दल निराशा व्यक्त केली असून हे अत्यंत लाजिरवाणे देखील म्हटले आहे. सुनीलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आदिपुरुष रामायण लक्षात घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे, असे म्हटले जाते, जर ते खरे असेल तर अशा भाषेचा वापर अत्यंत लज्जास्पद आहे. (हेही वाचा - Adipurush: आदिपुरुष चित्रपटाचे स्क्रिनिंग दरम्यान भगवान हनुमानाला पाहत असलेल्या माकडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्स म्हणाले 'दैवी कनेक्शन')
पोस्टमध्ये सुनील लाहिरी यांनी चित्रपटाचे संवाद आणि स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. चित्रपटातील काही डायलॉगवर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या चित्रपटाचे संवाद मनोज मुंतशीर यांनी लिहिले असून दिग्दर्शक ओम राऊत यांनी केलं आहे. सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. या पोस्टवर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे, ज्यांनी आमच्या आराध्य प्रभू रामाच्या कथेचा अपमान केला आहे. दुसर्याने एका युजर्सने म्हटलं आहे की, हा चित्रपट फक्त सनातन धर्माची बदनामी करण्यासाठी बनवला गेलेला चित्रपट आहे.
आदिपुरुषने पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये 95 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच, जगभरात 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बर्याच नकारात्मक पुनरावलोकनांमध्ये हे खूप चांगले आकडे आहेत. आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट आपला वेग कायम ठेवतो की त्याची पडझड सुरू होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.