Rahul Vaidya ने Disha Parmar सोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ; सिंगरने सुंदर अंदाजात घेतले चुंबन
अनेकांनी त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीचे कौतुकदेखील केलं आहे.
गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) ने आपली होणारी पत्नी दिशा परमार (Disha Parmar) सोबत सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हे दोघेही त्यांच्या नवीन गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अलीकडेच 'Madhanya' नावाचे गाणे रिलीज करण्यात आले. ज्यामध्ये हे दोघेही लग्न करताना दिसले होते. आता इंस्टाग्राम रील्सवर शेअर केलेल्या त्याच्या ताज्या व्हिडिओत राहुलचं दिशावर भरपूर प्रेम असल्याचं दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये राहुल दिशासाठी गुडघे टेकताना दिसला असून शेवटी तो तिच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुलने लिहिलं आहे की, "रियल सोबत रील. Madhanya ला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार." या पोस्टमध्ये त्याने दिशा परमारला टॅग देखील केले आहे. (वाचा - Ghana: अभिनेत्री Rosemond Brown ने स्वतःच्या मुलासोबत क्लिक केला Nude Photo; कोर्टाने सुनावली 90 दिवस तुरुंगवासाची शिक्षा)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अनेकांनी त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीचे कौतुकदेखील केलं आहे. बिग बॉस 14 च्या घरात राहुल आणि दिशा यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं.
यानंतर व्हॅलेंटाईन डेनिमित्त जेव्हा दिशाची पुन्हा घरात एन्ट्री झाली तेव्हा तिने राहुलचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला. राहुल बिग बॉस 14 चा उपविजेता असून त्याला रुबीना दिलकच्या पराभवाला सामोरे जावे लागले.