राधिका आपटे बोल्ड अंदाजात झळकली Vogue मॅगझिनवर (Photos)
राधिका आपटे (Photo Credits: Instagram)

अलिकडेच राधिका आपटे 'बाजार' आणि 'अंधाधून' या सिनेमांत झळकली. दोन्ही सिनेमात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्याचबरोबर या दोन्ही सिनेमात राधिकाचा हॉट अवतारही पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा राधिकाचे हॉट फोटोज सोशल मीडियावर हिट होत आहेत.

राधिका आपटेने वोग मॅगझिनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केले. या फोटोशूटमधील अनेक फोटोज व्हायरल होत आहेत. वोग इंडियाने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'वुमन ऑफ द इअर' च्या नोव्हेंबरच्या अंकासाठी हे फोटोशूट केले आहे.

नजर टाकूया राधिका आपटेच्या खास फोटोजवर....

 

 

 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पॅडमन' सिनेमात राधिकाने प्रमुख भूमिका साकारली होती. त्याचबरोबर राधिका नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेब सिरीजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली.