R Madhavn पहिल्यांदाच Ajay Devgan सोबत शेअर करणार स्क्रिन, दिसणार 'या' हॉरर थ्रिलर चित्रपटात
दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. खरंतर अजय आणि माधवन गुजराती चित्रपट 'वश'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या सतत चर्चेत असतो. 'दृश्यम 2' आणि 'भोला' या चित्रपटानंतर तो आता 'मैदान'मध्ये दिसणार आहे. 'दृश्यम 2' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानंतर आता अभिनेता पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत आर माधवनही (R Madhavan) दिसणार आहे. दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. खरंतर अजय आणि माधवन गुजराती चित्रपट 'वश'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये सुरू होणार आहे. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट एक हॉरर थ्रिलर असेल. 'वश' हा एक सायको थ्रिलर चित्रपट आहे, जो या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. आता याच्या रिमेकमध्ये अजय देवगण आर माधवनसोबत दिसणार आहे.
ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याने लिहिले, 'आर माधवन अजयच्या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात सामील झाला आहे. विकासच्या सुपरनॅचरल थ्रिलरमध्ये ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असून चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. अजय देवगण या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. (हे देखील वाचा: Parineeti Chopra-Raghav Chaddha Engagement: बहिण परिणितीच्या साखरपुड्यासाठी Priyanka Chopra, Nick Jonas आणि लेक Malti विना दिल्ली मध्ये दाखल (Watch Video)
शीर्षक नसलेला चित्रपट अजय, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली तयार करत आहेत. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून जूनमध्ये तो फ्लोरवर जाईल. या चित्रपटाचे मुंबई, मसुरी आणि लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)