Pushpa on Amazon Prime: 300 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलेला Allu Arjun चा 'पुष्पा' Amazon Prime वर होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

विशेषतः हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. चित्रपटगृहांमध्ये मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये कोट्यवधी रुपयांचा करार झाला आहे.

(Photo Credit - Youtube)

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे, देशातील अनेक शहरांमध्ये वीकेंडला लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे लोक पुन्हा एकदा चित्रपटगृहांपासून दुरावले आहेत.  अशा परिस्थितीत लोक घरीच OTT प्लॅटफॉर्मवर वेगवेगळा कंटेंट पाहत आहेत करत आहेत. आता ताज्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) हा चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये ज्यांना हा चित्रपट आतापर्यंत पाहायला मिळाला नाही, असे लोक घरी बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

हा चित्रपट 7 जानेवारीला Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. स्वतः Amazon Prime ने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. रणवीर कपूरचा 83 आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा हे साधारण एकाचवेळी प्रदर्शित झाले होते. परंतु पुष्पामुळे लोकांनी 83 कडे पाठ फिरवली. काही चित्रपटगृहांमध्ये पुष्पाचे शोज वाढवण्यासाठी 83 काढूनही टाकण्यात आला होता.

17 डिसेंबरपासून चित्रपटगृहांमध्ये झळकणाऱ्या पुष्पा या चित्रपटाला सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. चित्रपटगृहांमध्ये मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये कोट्यवधी रुपयांचा करार झाला आहे. 'पुष्पा: द राइज' चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने या चित्रपटात पुष्पा राज नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती. (हेही वाचा: कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ)

दरम्यान, पुष्पा या चित्रपटात जंगलातील चंदनाची होत असलेल्या तस्करीविरुद्धचा अल्लू अर्जुनचा लढा पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना सोबत मल्याळम चित्रपट स्टार फहाद फासिल देखील आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेत बनला आहे परंतु त्याचसोबत हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif