Pushpa The Rule: पुष्पा मधील 6 मिनिटांच्या सीनसाठी खर्च केले 60 कोटी, शूटिंगसाठी लागले 'इतके' दिवस
फक्त 6 दिवसाचे सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे. चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ आणि एक फाइट सीन आहे.
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा २ (Pushpa 2) चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर या चित्रपटाच्या टीमनं 'पुष्पा द रूल' ची घोषणा केली. सध्यातरी प्रेक्षकांच्या भेटीला 'पुष्पा द रूल' चं पोस्टर आणि टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. टीझरमधील भव्य दिव्य सेट पाहून, डोळे दिपवून टाकणारी लाईट डोळे दिपावणारी आहे. या चित्रपटातील एका सीनसाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे. (हेही वाचा - Pushpa 2: 'पुष्पा 2' समोर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'ची माघार, रिलीज डेट पुढे ढकलणार)
6 मिनिटांच्या सीनसाठी निर्मात्यांनी तब्बल 60 कोटी रूपये खर्च केले आहेत. फक्त 6 दिवसाचे सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे. चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ आणि एक फाइट सीन आहे. फक्त तो 6 मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा सीन शूट करण्यासाठी तब्बल 30 दिवस लागले होते. चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 ला रिलीज होणार असून निर्मात्यांनी या चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट 500 कोटींच्या आसपास पोहोचले आहे.
‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.