ग्लॅमरस अंदाजात न्युयॉर्क येथील मादाम तुसाद संग्रहालयात 'प्रियंका चोप्रा'चा मेणाचा पुतळा (Photos, Video)
हॉलिवूडमधील तिच्या उत्तम कामगिरीमुळे ती ग्लोबल स्टार बनली आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हीने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही आपला झेंडा रोवला आहे. हॉलिवूडमधील तिच्या उत्तम कामगिरीमुळे ती ग्लोबल स्टार बनली आहे. तिच्या दिवसागणित वाढणाऱ्या लोकप्रियतेचे आणखी एक उदाहरण समोर येत आहे. अमेरिकेतील न्युयॉर्क (New York) येथील मादाम तुसाद (Madame Tussauds) या संग्रहालयात प्रियंकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. इतकंच नाही तर लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे. यामुळे मादाम तुसादच्या चार संग्रहालयात पुतळा असणारी प्रियंका चोप्रा पहिली सेलिब्रेटी बनली आहे. आतापर्यंत अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन (Whitney Houston) हिचे मादाम तुसादच्या तीन संग्रहालयात मेणाचे पुतळे होते.
अलिकडेच प्रियंकाने न्युयॉर्कमधील मादाम तुसाद संग्रहालयाला भेटी दिली. या खास क्षणांचे फोटोज आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियंका चोप्रा लवकरच 'इजन्ट इट रोमॅन्टिक' हा हॉलिवूड सिनेमात तर 'स्काय इज पिंक' या बॉलिवूड सिनेमात झळकेल.