Priyanka Chopra Amazon Prime Deal: प्रियंका चोप्राने अ‍ॅमेझॉन प्राइमशी केला कोट्यावधी रुपयांचा करार; हिंदी व इंग्रही भाषेत बनवणार कंटेंट

त्यात चित्रपट सृष्टी बऱ्यापैकी प्रभावित झाली आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने निर्माते, अभिनेते ओटीटी व्यासपीठाचा आधार घेताना दिसून येत आहेत.

प्रियंका चोप्रा (File Image: IANS)

सध्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहे. त्यात चित्रपट सृष्टी बऱ्यापैकी प्रभावित झाली आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने निर्माते, अभिनेते ओटीटी व्यासपीठाचा (OTT Platforms) आधार घेताना दिसून येत आहेत. आता 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) अ‍ॅमेझॉन प्राइमशी (Amazon Prime) एक मोठा करार केला आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, प्रियंका चोप्राने अ‍ॅमेझॉन प्राइमसोबत पूर्ण 2 वर्षासाठी मल्टी मिलियन डॉलरची ‘फर्स्ट लूक टेलिव्हिजन डील' (First-Look Television Deal) साईन केली आहे. स्वत: प्रियंका चोप्रानेही याची पुष्टी केली आहे.

प्रियंकाने या मासिकाचा अहवाल शेअर करत सांगितले आहे की, आता ती भाषेच्या मर्यादा तोडुन वेबसाठी एक उत्तम कंटेंट तयार करेल.  आंतरराष्ट्रीय मासिका व्हरायटी (Variety) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा फोटो शेअर करत प्रियंकाने  इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, 'अभिनेत्री आणि निर्माती म्हणून मी नेहमीच स्वप्न पाहते की, जगभरातील कुशल लोक सर्जनशील कंटेंट तयार करण्यासाठी एकत्र काम करतील आणि यासाठी कोणत्याही भाषेची सीमा असू नये. माझे प्रॉडक्शन हाऊस, 'पर्पल पेबल पिक्‍चर्स' चे नेहमीच हे ध्येय राहिले आहे व आता अ‍ॅमेझॉन बरोबरच्या माझ्या कराराचे ध्येय देखील हेच आहे.'

 

View this post on Instagram

 

YESSSS @amazonstudios, LET’S 👏GET 👏 IT!!! So honored and excited to finally share this news with you. ⁣⁣ ⁣⁣ Looking ahead, we already have so much on our slate! Big thank you to @jsalke and her team at Amazon for being such great partners, and for sharing in the belief that talent and good content knows no boundaries.⁣⁣ ⁣⁣ As both an actor and producer, I have always dreamt of an open canvas of creative talent coming together from all over the world to create great content irrespective of language and geography. This has always been the DNA of my production house Purple Pebble Pictures, and is the foundation of this exciting new endeavor with Amazon. ⁣⁣ ⁣⁣ And as a storyteller, my quest is to constantly push myself to explore new ideas that not only entertain, but most importantly, open minds and perspectives. ⁣⁣Looking back on my 20 year career, nearly 60 films later, I hope that I’m on my way to achieving that. ⁣⁣ ⁣⁣ Thank you to all of you who have been a big part of my journey so far. And for those who are just getting to know me, or maybe only recognize me as Alex Parrish from Quantico, I’m excited for you to get to know me better. ⁣ @purplepebblepictures⁣⁣ @variety @marcmalkin

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंकाने हे स्पष्ट केले आहे की, एक कलाकार आणि कथाकार म्हणून तिला नेहमीच नवीन कल्पनांवर काम करण्याची इच्छा असते जे केवळ मनोरंजनच नाही, तर लोकांच्या मनावर आणि विचारांवर प्रभाव पाडेल. प्रियंकाने पुढे लिहिले आहे, 'माझ्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत, 60 पेक्षा जास्त चित्रपट केल्यावर आज मला वाटत आहे की मी माझ्या स्वपांच्या मार्गावर चालत आहे.' (हेही वाचा: अभिषेक बच्चन चा वेब शो Breathe- Into The Shadows चा दमदार ट्रेलर झाला प्रदर्शित,)

या बहु-मिलियन करारापूर्वीच प्रियंका चोप्रा तिचा नवरा निक जोनाससमवेत 'संगीत' नावाच्या रिअॅलिटी डान्स शोवर काम करत आहेत. हा कार्यक्रम भारतीय विवाहसोहळ्यातील संगीताच्या विधीवर आधारित असेल. याशिवाय प्रियंका अ‍ॅमेझॉनच्या एका गुप्तहेर ड्रामाचाही हिस्सा आहे. प्रियंकाचा हा नवा करार जागतिक असल्याने, त्याद्वारे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये कंटेंट तयार होणार आहे.