Prabhu Deva करणार दुसरं लग्न? भाचीसोबत अफेअर्सच्या चर्चांना उधाण

परंतु, सध्या त्यांनी एका वेगळ्याच कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रभुदेवा दुसरं लग्न करणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

Prabhu Deva To Marry Soon? (Photo Credits: Instagram)

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभुदेवा (Prabhu Deva) आपले नृत्य कौशल्य, सिनेमा आणि कामांमुळे चर्चेत असतात. परंतु, सध्या त्यांनी एका वेगळ्याच कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रभुदेवा दुसरं लग्न करणार अशा चर्चांना उधाण आले आहे. 9 वर्षांपूर्वी प्रभुदेवा पहिली पत्नी रामलता यांच्यापासून वेगळे झाले. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. प्रभुदेवा पुन्हा प्रेमात पडले असून लवकरच ते आपल्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करण्याची तयार करत आहेत, असे बोलले जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रभु देवा आपल्या भाचीच्या प्रेमात पडले असून त्यांच्या अफेअरच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून डेट करत आहेत. आता ते लग्नाचा विचार करत आहेत. मात्र या बातमीनंतर प्रभुदेवाचे चाहते काहीसे थक्क झाले आहेत. मात्र या सर्व चर्चांवर प्रभुदेवा किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (सलमान खान ही थिरकला प्रभुदेवा सोबत त्याच्या खास अंदाजात 'उर्वशी..' गाण्यावर; सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल, Watch Video)

प्रभुदेवा यांचे अभिनेत्री नयनथार यांच्यासोबतचे अफेअरही खूप गाजले. प्रभुदेवा अभिनेत्री नयनथारा यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशीप मध्ये राहत असल्याचे त्यांची पत्नी रामलता यांनी म्हटले होते. 2010 मध्ये त्यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. यावेळी अभिनेत्री नयनथारा यांनी तामिळ संस्कृतीचा अनादर केल्याचा आरोप अनेक महिला संघटनांनी केला होता. तसंच नयनथारा यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. त्यानंतर 2012 मध्ये प्रभुदेवा नयनथारा यांच्यापासून वेगळे झाले.

दरम्यान, राधे: योर मोस्ट वांटेड भाई या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहेत. या सिनेमात सलमान खान आणि दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत. कोविड-19 लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे चित्रीकरण लांबणीवर पडले होते. त्यानंतर सिनेमाच्या शूटींग पूर्ण करण्यासाठी मुंबईतील मेहबुब स्टुडिओ एक महिन्यासाठी बुक करण्यात आला होता. याशिवाय प्रभुदेवा साऊथ मधील काही सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif