Porn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर  
गहना वसिष्ठ (Image Credit: Instagram)

अभिनेत्री गहना वसिष्ठ हिला पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणी मुंबई सेशन कोर्ट कडून अंतरिम जामीन नाकारण्यात आला आहे.आता गहाना वशिष्ठने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला आहे.सोशल मिडीयावर बरीच मोठी पोस्ट शेअर करत गहना ने फिल्म सेक्शन 375(Section 375) पोस्टर शेअर केले आहे.खरं तर, अनेक मुलींनी गहनावर सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) शूट करण्याचा आणि जबरदस्तीने दबाव आणल्याचा आरोप केला आहे. (Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री Gehana Vasisth ला Mumbai Sessions Court कडून Interim Relief नाहीच; 6 ऑगस्टला पुढील सुनावणी )

गहना ने पोस्ट मध्ये लिहिले आहे की,''मला अजून दोषी ठरवले गेले नाही पण माझा संपूर्ण तमाशा केला जात आहे. ज्या मुलींनी प्रत्यक्षात अश्लील चित्रपट केले आहेत जे इंटरनेटवर सर्वत्र उपस्थित आहेत.कोणी आरोपकर्त्याची पार्श्वभूमी तपासणी करते का? हे कसे चालू शकते? कोणतीही मुलगी पैशासाठी खोटे बोलेल. जर हे असेच चालू राहिले तर एक दिवस रस्त्यावर चालणे देखील अवघड होईल. काही मुली खोटे आरोप करतील आणि पैशासाठी केस करतील .आणि ज्याच्यावर खोटे आरोप झाले आहेत त्याला निर्दोष ठरवण्यासाठी त्याच्या कुटुंबाचे आयुष्य जाईल.''

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

 

पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गहाना वसिष्ठला अटक केली होती. तेव्हापासून ती जामिनावर बाहेर आहे. पण 19 जुलै रोजी जेव्हा पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली तेव्हा पुन्हा एकदा गहाना चर्चेत आली.