पॉपस्टार गुरु रंधावा याच्यावर कॅनडा मध्ये अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला, मारेकरी फरार

यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Guru Randhawa (Photo Credits : Instagram)

पंजाबचा प्रसिद्ध पॉपस्टार गुरु रंधावा (Guru Randhawa) याचा एका पेक्षा एक हिट गाणी देण्यात हातखंडा आहे असे म्हणायला हरकत नाही. हाय रेटेड गबरु (High Rated Gabru) , बन जा तू मेरी रानी (Ban ja Tu Meri Rani) , सूट सूट करदा (Suit Suit Karda) या गाजलेल्या गाण्यांमुळे या पॉपस्टारचे जगभरात अनेक फॅन्स आहेत, आपल्या फॅन्ससाठी त्याने अलीकडेच कॅनडा (Canada) मधील वॅनकूवर (Vancouver) येथे एक शो सुद्धा केला होता, पण या शो नंतर त्याच्यासोबत असे काही झाले की ज्याचा कोणीही विचार केला नसेल. The Tribune च्या वृत्तानुसार, वॅनकूवर मध्ये शो संपवून बाहेर पडत असतानाच एका अज्ञाताने गुरु रंधावावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी मारेकरी व्यक्तीने काहीशी जड वस्तू गुरु रंधावाच्या डोक्यात मारली ज्याचा मार इतका तीव्र होता की त्यामुळे गुरूच्या डोक्यातून अक्षरशः रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

ट्विट

या प्रकरणी गुरु रंधावाच्या इंस्टग्राम वरून माहिती देण्यात आली आहे, ज्यानुसार गुरु च्या यूएसए/कॅनडा टूर दरम्यान 28 जुलैला वॅनकूवर मधील क्वीन एलिझाबेथ थेटर (Queen Elizabeth Theatre) मध्ये एक  शो आयोजित करण्यात आला होता. या शो दरम्यान प्रेक्षकांनी मारेकरी व्यक्तीला गैरवर्तणूक करताना पाहिले होते. तसेच तो वारंवार स्टेजवर येण्याचा प्रयत्न करत होता, त्यासाठी त्याने आयोजकांशी भांडण केले होते. कदाचित याच  रागाने या व्यक्तीने शो संपताच गुरु रंधावा वर हल्ला केला. आणि त्यानंतर तो ताबडतोब तिथून गायब झाला. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

गुरु रंधावा Instagram Post

दरम्यान, या अनपेक्षित  हल्ल्यानंतर गुरु रंधावा याची अवस्था गंभीर झाली होती, त्यामुळे तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे उपचारादरम्यान त्याच्या डोक्याला चार टाके पडले आहेत, ज्यानंतर तो आता पुन्हा भारतात परतला आहे.