शालेय पाठ्यपुस्तकात छापला Sushant Singh Rajput चा फोटो; लहान मुलांसाठी आदर्श बनला दिवगंत अभिनेता

यात सुशांतला एका वडिलांच्या रूपाने दाखवले आहे. सुशांतची मैत्रीण स्मिता पारीखने ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करून त्याबाबत माहिती दिली आहे

Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook)

अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपल्यात नाही, परंतु आजही त्याचे चित्रपट, त्याचे काम, त्याच्या आठवणी यांच्या रूपाने तो अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. सुशांतचे चाहते त्याच्याशी संबंधित प्रत्येक बातमीची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, सुशांतबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा केला आहे की, सुशांतसिंग राजपूत याच्या फोटो बंगालमधील एका शाळेच्या टेक्स्ट बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा फोटो सुशांतची मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून घेण्यात आला आहे.

असे सांगितले जात आहे की, की हा फोटो मुलांना कौटुंबिक मूल्ये समजावून सांगण्यासाठी वापरला गेला आहे. यात सुशांतला एका वडिलांच्या रूपाने दाखवले आहे. सुशांतची मैत्रीण स्मिता पारीखने ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करून त्याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये सुशांतसोबत अंकिता लोखंडेही आहेत. स्मिता पारीख यांनी लिहिले आहे की, 'हे पाहून मला फार अभिमान वाटतो. आमच्या शिक्षण मंडळालासुद्धा वाटते की सुशांत सर्वोत्कृष्ट आहे.’

दुसरीकडे सुशांतचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे जोसुद्धा एका शालेय पाठ्यपुस्तकातील आहे. हा फोटो शेअर करत वापरकर्त्याने लिहिले आहे की. ‘हे माझ्या धाकट्या चुलत बहिणीचे शालेय विज्ञान पुस्तक आहे. ती तिसर्‍या वर्गात आहे. मानव म्हणजे काय, प्राणी म्हणजे काय हे या पुस्तकात दाखवण्यात आले आहे. याठिकाणी मानव म्हणजे काय हे दाखवण्यासाठी उदाहरण म्हणून सुशांतचा फोटो वापरण्यात आला आहे. हे पुस्तक बांग्ला भाषेत आहे.’ पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेमध्ये सुशांतचे नाव ‘मानव’ होते, कदाचित म्हणूनच पुस्तकात मानव आणि प्राणी यांच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी सुशांतच्या फोटोचा उपयोग केला गेला असावा.