Payal Ghosh's Shocking Claims: 'अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केला, गौतम गंभीर नियमितपणे मिसकॉल द्यायचा'; अभिनेत्री पायल घोषचे धक्कादायक दावे
ही गोष्ट मी इरफानलाही सांगितली होती, तो माझे सर्व कॉल चेक करायचा. मी जेव्हा पुण्यात इरफानला भेटले तेव्हा त्याने युसूफ भाई, हार्दिक आणि कृणाल पंड्यालाही या गोष्टी सांगितल्या होत्या.’
'प्रयणम' आणि 'ऊसरवेली' चित्रपटातील कामासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने सोशल मिडियावर काही धक्कादायक दावे केले आहेत. ती म्हणाली की, खासदार गौतम गंभीर तिला नियमितपणे फोन करत असे आणि माजी क्रिकेटपटू इरफान पठाण हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्यावर तिचे प्रेम होते. पायलने सोशल मिडिया व्यासपीठ X (पूर्वीचे ट्विटर) वर काही पोस्ट्स करत हे दावे केले आहेत. ती म्हणते, ‘इरफान पठाणला मी 5 वर्षे डेट केले, मात्र नंतर सर्वकाही संपले. मी कुणावरही इतक्या सहजतेने विश्वास ठेवत नाही.’
ती पुढे म्हणते, ‘गौतम गंभीर, अक्षय कुमार हे सगळे माझ्या मागे होते, पण मी फक्त इरफान पठाणवर प्रेम करत होते. मला त्याच्याशिवाय दुसरे कोणी दिसत नव्हते. मी इरफानशी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत असे. मी फक्त इरफानवर प्रेम केले आणि दुसरे कोणावरही नाही. इरफान माझा बॉयफ्रेंड होता. आम्ही 2011 पासून डेट करत होतो आणि 2016 मध्ये त्याने लग्न केले.’
ती पुढे म्हणते, ‘गौतम गंभीर मला नियमितपणे मिसकॉल द्यायचा. ही गोष्ट मी इरफानलाही सांगितली होती, तो माझे सर्व कॉल चेक करायचा. मी जेव्हा पुण्यात इरफानला भेटले तेव्हा त्याने युसूफ भाई, हार्दिक आणि कृणाल पंड्यालाही या गोष्टी सांगितल्या होत्या.’ पायलने पुढे अनुराग कश्यपबाबत अतिशय गंभीर दावे केले आहेत. ती म्हणते, ‘अजून एक गोष्ट आहे, अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केला. मात्र अक्षय कुमारने माझ्याशी कधीही गैरवर्तन केले नाही. तो इतका मोठा स्टार आहे, मी नेहमीच त्याचा आदर करेन.’ (हेही वाचा: Actor Rakhi Sawant ला कोर्टाचा दिलासा; पती Adil Durrani ने त्याचे खाजगी व्हिडिओ मीडीयात दाखवल्याप्रकरणी केली होती FIR)
दरम्यान, याआधी 2020 मध्येही पायलने चित्रपट निर्माता अनुराग कश्यप विरुद्ध लैंगिक छळ झाल्याबद्दल भाष्य केले होते. तिने असा दावा केला होता की, 2014 मध्ये अनुरागने तिच्यासमोर कपडे काढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कश्यपने पायलने त्याच्यावर लावलेले लैंगिक गैरवर्तनाचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. 2023 च्या वर्ल्ड कप दरम्यान या अभिनेत्रीने मोहम्मद शमीला प्रपोज केले होते. तिने सोशल मिडियावर लिहिले होते, ‘शमी, तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.’