Pathaan Release: बॉलिवूडच्या बादशाहचं धमाकेदार कमबॅक! पहिल्याचं दिवशी पठाणने जमवला ५० कोटींचा गल्ला

तरी किंग खानच्या पठाणसाठी पहिल्याचं दिवशी सिनेमागृहात मोठी गर्दी बघायला मिळत असुन जवळपास ५० कोटींचा गल्ला केल्याची चर्चा आहे.

Pathaan Poster (PC - Facebook)

तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार एण्ट्री मारली आहे. शाहरुखचा चर्चित, कॉन्ट्रोव्हर्सल आणि मोस्ट अवेटेड सिनेमा पठाण आज प्रदर्शित झाला आहे. तरी  किंग खानच्या पठाणसाठी पहिल्याचं दिवशी सिनेमागृहात मोठी गर्दी बघायला मिळत असुन जवळपास ५० कोटींचा गल्ला केल्याची चर्चा आहे. एवढचं नाही तर बाहूबली २ या सिनेमानंतर शाहरुखचा पठाण हा सर्वाधिक अडव्हान्स बुकींग झालेला सिनेमा ठरला असुन बॉलिवूडने यांत आपल्या नावी नवा विक्रम नोंदवला आहे. तरी पठाणची पहिल्या दिवशीची कमाई आणि शाहरुखच्या चाहत्यांचा भरगोस मिळणार प्रतिसाद-उत्साह बघता पठाण हा बॉलिवूड मधील ब्लॉकबास्टर सिनेमा ठरेल यांत काहीही शंका नाही. तरी तुम्ही पठाण बघितलात का किंवा पठाण बघायला जाण्याची योजना आखत आहात का तर प्रीबुकींगविना सिनेमाच्या सिट्स मिळण जरा अवघड आहे. पहिल्या दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला असला तर सिनेमाचं खरं भविषय हे येणाऱ्या आठवड्यात कळेल.

 

यापूर्वीही बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमा आलेत ज्यांनी पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली पण अवघ्या दोन दिवसांतचं हरी हरी. म्हणजे या शुक्रवारी आलेला सिनेमा पुढील आठवड्यापर्यत देखील सिनेमेगृहात टिकत नाही. म्हणून पठाणला शाहरुखचे फॅन्स कसा प्रतिसाद देतात हे बघणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी हृतिक रोशनच्या वॉरने रु. 53.3 कोट), आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानने 52 कोटी रुपये तर कन्नड चित्रपट KGF: Chapter 2 ने रु. 53.9 कोटींचा पहिल्याचं दिवशी रेकॉर्ड केला होता. पण आता शाहरुखचा पठाण या सगळ्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडणार की या सिनेमाच्या रांगेत आपले स्थान मिळवणार याकडे बॉलिवूड विश्वाचं लक्ष लागलं आहे. (हे ही वाचा:-Ram Gopal Varma: सुप्रसिध्द दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या जीवाला धोका, रामगोपाल वर्मा यांचं सुचक ट्विट)

 

तरी पठाण हा सिनेमा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असुन याचा संबंध ऋतिक रोषनच्या वॉर सिनेमाशी जोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी पठाणमध्ये ऋतिक रोशन देखील झळकण्याची चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सध्या चित्रपटाचा पहिलाचं शो पार पडला आहे. सिनेमाचे रिव्ह्यूज आणि क्रीटीक्स लवकरचं जनतेपुढे येतील. तरी पठाणची चर्चा फक्त भारतातचं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आहे. कारण विविध देशा किंग खानची मोठी फॅन फॉलोविंग आहे.