Pathaan चित्रपटाने रिलीजपूर्वी रचला इतिहास! ICE थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा ठरला पहिला चित्रपट; ICE थिएटर म्हणजे काय? जाणून घ्या

यशराज फिल्म्सने पठाणच्या पुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Pathaan Poster (PC - Facebook)

Pathaan: शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा 'पठान' (Pathaan) हा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, एड्रेनालाईन-पंपिंग चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे आणि ICE थिएटर (ICE Theatre) फॉरमॅटमध्ये रिलीज होणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

पठाण आयसीई थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार -

यशराज फिल्म्सने पठाणच्या पुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष रोहन मल्होत्रा, म्हणतात, “आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की पठाण हा ICE फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट असेल. ज्यामुळे प्रेक्षकांना एक तल्लीन अनुभव मिळेल." (हेही वाचा -Greatest Actors of All Time: एम्पायर मॅगझिनच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत Shah Rukh Khan ला स्थान; असा मान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता)

ICE थिएटर म्हणजे काय?

ICE थिएटर्समध्‍ये साइड पॅनेल्‍सचा समावेश होतो. जे मुख्‍य स्‍क्रीनसह, एक परिधीय दृष्‍टी निर्माण करतात. ज्यामुळे स्‍क्रीनवर आणखी रंग आणि गती दिसू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर, डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस, द बॅटमॅन, फॅन्टास्टिक बीस्ट्स: द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर, टॉप गन: मॅव्हरिक आणि मॉर्बियस सारखे चित्रपट या हाय-एंड फॉरमॅटमध्ये ICE थिएटर्समध्ये प्रदर्शित झाले आहेत.

रोहन मल्होत्रा यांनी सांगितलं की, “अवतार: द वे ऑफ वॉटरच्या स्क्रीनिंगसह या फॉरमॅटने भारतात पदार्पण केले आहे. इतर कोणाच्याही आधी नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि अंगीकारणे हा नेहमीच आमच्या YRF DNA चा भाग राहिला आहे." (हेही वाचा - Besharam Rang Song Row: शाहरुख खान-दीपिकाच्या "बेशरम रंग" या गाण्यासंबंधी काय म्हणाली रश्मी देसाई, पाहा)

ते पुढे बोलताना म्हणाले की, “आम्ही यापूर्वी अनेक प्रयोग केले आहेत. चित्रपटांचे प्रिमियम स्वरूप स्वीकारणारी यशराज फिल्म्स ही भारतातील पहिली कंपनी आहे. यशराज फिल्म्सने धूम 3 चित्रपट IMAX स्वरुपात प्रदर्शित केला. IMAX मध्ये प्रदर्शित होणार हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तसेच ठग्स ऑफ हिंदोस्तान 4DX आणि MX4D मध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.