Mother’s Day 2022: 'मदर्स डे'च्या निमित्ताने आईसोबत बसून पहा 'हे' खास चित्रपट
Mother’s Day 2022: मदर्स डे 8 मे रोजी म्हणजे रविवार साजरा होणार आहे. हा दिवस मातांसाठी खूप खास आहे. या दिवशी मुले आपल्या आईला स्पेशल वाटण्याची संधी सोडत नाहीत. मदर इंडियापासून ते मॉमपर्यंत ज्या पद्धतीने आपण सिनेमाच्या दुनियेत बदल झाले आहेत त्याच पद्धतीने खऱ्या आयुष्यातही मातांच्या व्यक्तिमत्त्वात बरेच बदल झाले आहेत. या मदर्स डेच्या निमित्ताने मातृत्वाचे प्रत्येक पैलू साजरे करत, मोठ्या पडद्यावर अशाच काही पात्रांसोबत वेळ घालवूया ज्यांनी आपल्याला गेल्या अनेक वर्षांत खूप काही अनुभवायला दिले आहे. मदर्स डे च्या दिवशी खालील चित्रपट पाहून हा दिवस नक्की खास करा.
Mother India -
हा चित्रपट कोणीच विसरणार नाही. मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया या चित्रपटात नर्गिसने एका असहाय्य आईची भूमिका साकारली होती. जी आपल्या मुलांसाठी जगाशी लढते. यामध्ये आईचं पात्र जेवढं सशक्त दाखवलं गेलं ते क्वचितच इतर कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळालं नाही. (हेही वाचा - Mother's Day 2022 Images :Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे मातृदिनाच्या द्या खास शुभेच्छा)
नीरजा -
नीरजा ही फ्लाइट अटेंडंटची कथा आहे. जे देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देते. या चित्रपटात शबाना आझमी यांनी नीरजाच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शबाना आझमी प्रत्येक पावलावर आपल्या मुलीला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र उभ्या होत्या.
MOM Film -
2017 मध्ये रिलीज झालेल्या मॉम या चित्रपटात श्रीदेवी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीक मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात आर्या नावाच्या मुलीचे आयुष्य बदलते जेव्हा तिच्या शाळेतील काही मुले तिच्यावर बलात्कार करतात. या चित्रपटात श्रीदेवी एका आईच्या भूमिकेत आहे, जी आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी खाजगी गुप्तहेराची मदत घेते. तुम्ही हा चित्रपट zee5 वर पाहू शकता.
सिक्रेट सुपरस्टार -
2017 मध्ये सिक्रेट सुपरस्टार चित्रपटही आला होता. यामध्ये आई आणि मुलीची भावनिक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात नजमा नावाची मुलगी असून तिचे वडील तिच्या आईला मारहाण करतात. नजमा गाण्याचे करिअर सुरू करते आणि पैसे कमवते जेणेकरून ती तिच्या आईला तिच्या वडिलांपासून वाचवू शकेल आणि महागडे वकील करून घटस्फोट घेऊ शकेल. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Maatr -
Maatr हा चित्रपट एका अशा आईची कथा आहे जिच्या मुलीवर बलात्कार होतो. पण ही आई ना तुटते ना हरते. प्रत्येक पावलावर ती व्यवस्थेशी लढते आणि तिच्या मुलीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देते. ती एक सशक्त आई आहे, रवीना टंडन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती.
पंगा -
पंगा हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील महिला कबड्डीपटूच्या जीवनावर बनवण्यात आला आहे. यात एका मुलीची कहाणी आहे जी आई झाल्यानंतर पुन्हा खेळाच्या मैदानात येते आणि आपली हरवलेली ओळख जिंकते. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त जस्सी गिल, यज्ञ भसीन, नीना गुप्ता आणि रिचा चड्ढा आहेत. तुम्ही तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
English Vinglish Movie -
तुम्ही श्रीदेवीचा आणखी एक उत्तम चित्रपट, इंग्लिश विंग्लिश पाहू शकता. तुम्ही तो तुमच्या संपूर्ण कुटुंबासह पाहू शकता. यात एक शांत, गोड स्वभावाची गृहिणी तिच्या सुशिक्षित पती आणि मुलीपासून कशी दूर जाते? कारण तिला इंग्रजी बोलण्यात आणि समजण्यास त्रास होतो? हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात श्रीदेवी आणि आदिल हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अश्वनी अय्यर तिवारी दिग्दर्शित आहे.
Listen Amaya -
लिसन अमाया हा चित्रपटात अतिशय आधुनिक कथा दाखवण्यात आली आहे. जी एका तरुण मुलीची आई आहे आणि ती एक उत्साही आणि उत्कट स्त्री आहे. जिचे स्वतःचे एक वेगळे आयुष्य आहे. जी आपली 22 वर्षांची लेखिका मुलगी अमाया हिच्या संगोपन आणि जबाबदारीपासून दूर आहे. मदर्स डे निमित्त तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.