नुसरत जहां यांचा Lockdown दरम्यान चा TikTok वरील डान्स व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण, Watch Viral Video

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नुसरत जहां (Photo Credits TikTok )

कोविड-19 शी लढा देण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. कोरोना चे भारतात रुग्ण वाढल्यामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आला. त्यामुळे घरात राहून कंटाळलेले लोक रेसिपीज बनव, पुस्तक, सोशल मिडियावर गेम खेळणे यांसारखे विविध प्रकार आहेत. यात टिकटॉक व्हिडिओ बनविणे हे सध्या लॉकडाऊन मध्ये फॅड बनलय. यात आतापर्यंत अनेक बॉलिवूड, मराठी कलाकारांनी आपले व्हिडिओ बनविले आहेत. याच बरोबर आता एका राजकीय क्षेत्रातील महिलेने देखील आपला टिकटॉक व्हिडिओ बनविला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) यांनी आपला एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये नुसरत नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. TikTok साठी शिल्पा शेट्टी चा झालेला हा अवतार पाहून तुम्हीही क्षणभर व्हाल अवाक्, Watch Video

@nusratchirps##Savage ##savagechallenge ##fyp let’s do it @mimichakraborty86 @srabantigintu my ##savagegirls♬ Savage - Megan Thee Stallion

यात नुसरत जहां यांनी काळ्या रंगाचे टॉप आणि डेनिम शॉट्स घातले आहेत. यात तिचे डान्स स्टेप्स आणि उत्साह पाहण्याजोगा आहे. हा डान्स पाहून कुणालाही त्यांची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओला मिळालेल्या लाइक्स वरुन समजेल. हा व्हिडिओ अपलोड करताच काही मिनिटांतच याला 40,000 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

नुसरत जहां यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने त्यांना तिकिट दिले होते. या निवडणूक त्यांनी जिंकली देखील होती. नुसरत जहां यांचे मागील वर्षी बिझनेसमन निखिल जैन यांच्यासह विवाह झाला.