Aditi Rao Hydari and Siddharth: नवविवाहित अभिनेत्री अदिती राव हैदर पती सिध्दार्थ सोबत मुंबई विमानतळावर झाली स्पॉट, साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मन (Watch Video)

अलीकडचे ते दोघेही मुंबई विमानातळावर स्पॉट झाले. अदिती रावने कपाळावर सिंदूर लावलेला आणि गुलाबी रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे.

Aditi Rao Hydari and Siddharth Make First Public Appearance Together After Their Wedding PC INSTA

Aditi Rao Hydari and Siddharth: अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिध्दार्थ यांचे नुकतचं लग्न झाले. अलीकडचे ते दोघेही मुंबई विमानातळावर स्पॉट झाले. अदिती रावने कपाळावर सिंदूर लावलेला आणि गुलाबी रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अदिती आणि सिध्दार्थच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. मुंबई विमानतळावरील अदिती राव आणि सिध्दार्थ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोघांन्ही एकमेकांचा हात धरला आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिले आहे. अदितीच्या साधेपणामुळे चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला.

अदिती राव हैदरीने १६ सप्टेंबर रोजी सिध्दार्थ सोबत लग्न उरकलं. तेलंगणातील वानापर्थी येथील ४०० वर्षे जुन्या श्रीरंगपूर मंदिरात दोघांन्ही गुपचूप लग्न केले. या लग्नाला कुटुंबियांनी हजेरी लावली होती.  त्यानंतर दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले. लग्नाच्या फोटोंसोबत आदिती आणि सिद्धार्थने एकमेकांसाठी पोस्ट लिहिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लग्नासंदर्भात अदितीने कोणालाही माहिती दिली नव्हती.  सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का लागला. काल दोघेही विमानतळावर स्पॉट झाले. अदिती आणि सिध्दार्थने कॅमेऱ्यासमोर पोज दिले.