New OTT Releases: 'खिचडी 2' पाहून 'आर्या 3' पर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहेत अनेक सिरीज आणि चित्रपट, घ्या जाणून
या आठवड्यात, 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान, एकूण 11 ते 13 चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
New OTT Releases: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे (OTT Platforms) चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची क्रेझ बरीच कमी झाली आहे. प्रत्येक आठवड्याला विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात, 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान, एकूण 11 ते 13 चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. यादीतील पहिले नाव आहे सुष्मिता सेनची बहुप्रतिक्षित सिरीज आर्या 3 चे. या सिरीजचा तिसरा आणि शेवटचा सीझन आज 9 फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.
त्यानंतर भूमी पेडणेकरचा 'भक्षक' हा थ्रिलर चित्रपट आजपासून नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने रिपोर्टरची भूमिका साकारली आहे.
थिएटरमध्ये खळबळ माजवल्यानंतर आता धनुषचा 'कॅप्टन मिलर' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
महेश बाबूचा 'गुंटूर कारम' हा चित्रपटही ओटीटीवर धडकला आहे. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पहिला नसेल, तर आता तुम्ही तो तुमच्या घरी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हंसा, प्रफुल्ल, जयश्री आणि बाबूजींची चौकडी प्रेक्षकांना हसवण्यासाठी ओटीटीवरही आली आहे. खिचडी-2 हा चित्रपट आज ZEE5 प्रदर्शित झळा आहे.
साऊथचा आणखी एक चित्रपट 'काटेरा' देखील ओटीटीवर रिलीज झाला आहे. तुम्ही ZEE5 वर या कन्नड स्टार दर्शनच्या नवीनतम चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. (हेही वाचा: Pawan Kalyan's Fans Light Fire in Theatre: पवन कल्याणच्या जुन्या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठा उत्साह; थिएटरमध्येच लावली आग, पहा व्हायरल व्हिडिओ)
द नन II- 2018 च्या ब्लॉकबस्टर ‘द नन’चा सिक्वेल आणि द कॉन्ज्युरिंग युनिव्हर्समधील आठवा भाग, द नन-2 अखेर या आठवड्यात जिओ सिनेमावर रिलीज होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)