Neha Kakkar चे 'Baby Bump' असलेल्या वायरल फोटोमागील सत्य आले समोर, इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन गायिकेने दिली 'ही' माहिती

मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत नेहाने या फोटोमागचे सत्य आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. सोशल मिडियावरुन तिने याबाबत माहिती दिली आहे.

Neha Kakkar Baby Bump (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) हिने काल इन्स्टाग्रामवर तिचा बेबी बम्पसह (Baby Bump) फोटो शेअर केला आणि सगळीकडे एकच हल्लकल्लोळ झाला. हा फोटो पाहून अनेक जण अचंबित झाले तर अनेकांनी नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) यांना शुभेच्छा देखील दिल्या. मात्र सर्वांना एकच प्रश्न सतावत होता तो म्हणजे 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेली नेहा इतक्या लवकर गरोदर कशी काय राहिली? ही बातमी सोशल मिडियावर तर अगदी वा-यासारखी पसरली. यावर नेटक-यांनी तर सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस देखील पाडला. तर अनेकांमध्ये तिच्या प्रेग्नंसी संदर्भात चर्चा रंगू लागल्या. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत नेहाने या फोटोमागचे सत्य आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. सोशल मिडियावरुन तिने याबाबत माहिती दिली आहे.

या फोटोमध्ये कालच्या बेबी बम्पच्या फोटोमागे अल्बमचे नाव दिसत आहे. 'ख्याल रखियां कर' (Khyaal Rakhya Kar) असे तिच्या आणि तिचा पती रोहनप्रीत सिंहच्या आगामी अल्बमचे नाव आहे. येत्या 22 डिसेंबरला हा अल्बम प्रदर्शित होणार आहे.हेदेखील वाचा- Neha Kakkar ने Baby Bump फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो; 2 महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली नेहा कक्कड़ गरोदर?

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

रजत नागपाल हे या अल्बमचे दिग्दर्शक असून बब्बू हे या गाण्याचे गीतकार आहेत. या अल्बमच्या प्रमोशनसाठी नेहा कक्कड़ ने हा हटके फंडा वापरला होता. जो अगदी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. तिने या अल्बमची पोस्ट करुन माहिती देताच या पोस्टला काही मिनिटांतच 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत यांचा पारंपारिक विधींनुसार 24 ऑक्टोबर 2020 ला विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नाच्या विविध सोहळ्याचे, सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडीयामध्ये शेअर केले होते.