नेहा धुपिया ला Troll करणा-यांवर भडकला पती अंगद बेदी, आपल्या 5 गर्लफ्रेंड्स चे फोटो शेअर करुन दिले सडेतोड उत्तर

यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली असून आपल्याही 5 गर्लफ्रेंडस आहेत असे सांगत त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

Neha Dhupia (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने MTV वरील Rodies मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाची सध्या बरीच चर्चा आहे. ही विधानामुळे सोशल मिडियावर ती ट्रोल झाली असून अनेकजण तिच्यावर टीका करत आहे. MTV च्या रोडिज शो मध्ये तिने एका स्पर्धकाची शाळा घेतली होती. त्या स्पर्धकाच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत चिट केले होते. त्यात तिचे 5 बॉयफ्रेंड्स होते असे त्याने सांगितले होते. त्यावर त्याने तिच्या कानाखाली मारली होती. यावर नेहाने त्याच्यावर आगपाखड केली होती. मात्र या विधानामुळे चर्चेत आलेल्या आपल्या पत्नीला अंगद बेदी (Angad Bedi) एका हटके अंदाजात उत्तर दिले आहे.

यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली असून आपल्याही 5 गर्लफ्रेंडस आहेत असे सांगत त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

पाहा फोटो:

 

 

View this post on Instagram

 

Sun MERI baat.. here are my 5 girlfriends!!!! Ukhad lo jo ukhad na hai!!!! @nehadhupia ✊️✊️ #itsmychoice

A post shared by Angad Bedi “ARVIND VASHISHTHH” (@angadbedi) on

इतकेच नव्हे तर हे फोटो दाखवून 'तुला काय करायचेय ते कर' असेही तो म्हणाला आहे. नेहा ने केलेल्या विधानावरुन न केवळ अंगद वर तर त्याच्या संपुर्ण परिवारावरही बोट उचचले जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या पत्नीची साथ देत ट्रोलर्सला अंगदने सडेतोड उत्तर दिले आहे.

नेहाने ही आपली बाजू मांडत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. आपले म्हणणे होते की, "महिलांसोबत हिंसा करणे हे चुकीचे आहे इतकेच." त्यामुळे तुम्ही आपल्या कुटूंबाला टार्गेट करु नका असेही ती पुढे म्हणाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif