प्रेग्नन्सी नंतर मिळेना काम; बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया ने व्यक्त केली नाराजी

अलीकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेग्नन्सी (Pregnancy) नंतर खूप प्रयत्न करूनही कोणी आपल्याला काम देण्यास उत्सुक नसल्याची खंत व्यक्त केली आहे

Neha Dhupia (Photo Credits : Instagram)

बॉलिवूडची (Bollywood) एकेकाळीची प्रसिद्ध अभिनेत्री, मिस इंडियाची मेंटॉर (Miss India Mentor) , MTV वरील प्रसिद्ध शो रोडीजची (Roadies) परीक्षक आणि नो फिल्टर नेहा (No Filter Neha) या फंडू शो ची अँकर नेहा धुपिया (Neha Dhupia) हिला मागील काही काळापासून कामाची कमी जाणवत आहे. अलीकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेग्नन्सी (Pregnancy)  नंतर खूप प्रयत्न करूनही कोणी आपल्याला काम देण्यास उत्सुक नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच अभिनेत्रींना अनेकदा प्रेग्नन्सी नंतर वाढलेल्या वजनावरून सुद्धा टार्गेट केलं कात असल्याचं नेहाने म्हंटल आहे.

पिंकविलाला नेहाने दिलेल्या मुलाखतीत “काम करण्याची इच्छा ठेवताना कोणी व्यक्ती आपल्याकडे काम घेऊन येईल याची वाट पाहात मी बसत नाही. उलट स्वत: मेहनत करून काम मिळवण्याचे प्रयत्न करते.माझ्या प्रेंगन्सी ब्रेकनंतर देखील मी सिनेमांमध्ये काम मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु मला अनेकांनी नकार दिला. सध्या मी वेब सीरीजमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न करत आहे", अशी खंत बोलून दाखवली.

 

View this post on Instagram

 

Happy 1st Birthday our little angel .... my heart is so full of love... I don’t know what I am capable of giving you but you gave me the best gift of my life, the gift of motherhood. May god bless you ... Guru ‘Mehr’ Karein 🎉❤️😍

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

तर अनेकदा प्रेगनन्सी नंतर वाढत्या वजनामुळे देखील टार्गेट केले जाते असा खेद तिने व्यक्त केला. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर शरीरात होणारे बदल हे नैसर्गिक आहेत मात्र तरीही अनेकदा लोक ते समजून घेत नाहीत, काही वेळा तर महिला सुद्धा यावर अजब सवाल करतात, आणि हे अगदी दुःखद आहे, असेही नेहा म्हणाली. गर्भवती अभिनेत्री एमी जैक्सन चे टॉपलेस फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या अशा विचित्र प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

#happydiwali from ours to yours 💓. . . Love , Mehr ,Angad n Neha . 📸 @rjdeigg

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

नेहाने गेल्या वर्षी आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड अंगद बेदी याच्यासोबत लग्न केले होते. तिला ‘मेहेर’ नावाची एक वर्षाची मुलगी आहे. मेहेर आणि नेहा अनेकदा आपले हॅप्पी फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.