Nawazuddin Siddiqui च्या आईने आपल्या सुनेविरुद्ध दाखल केला गुन्हा; मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

तिने लिहिले आहे की, पोलिसांनी तिचा पती नवाजुद्दीन विरुद्ध दिलेल्या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष केले, परंतु आता लगेचच तिच्यावर गुन्हा दाखल केला.

नवाजुदीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) उर्फ ​​जैनब हिला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिशा यांनी आलियाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आलियावर घरात घुसून मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सोमवारी (23 जानेवारी 2023) आलियाला चौकशीसाठी समन्स पाठवले. दुसरीकडे, आलियाने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

आलियाने मुंबई पोलिसांच्या समन्सची प्रत तिच्या इंस्टाग्राम हँडलवर टाकली आहे. हे समन्स वर्सोवा पोलीस ठाण्यातून आले आहे. समन्समध्ये म्हटले आहे की, आलियाविरुद्ध आयपीसी कलम 452, 323, 504 आणि 506 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी आलियाला पोलीस ठाण्यात येऊन तिची बाजू मांडण्यास सांगितले. ती हजर झाली नाही, तर या प्रकरणात तिला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असे गृहीत धरून पोलीस पुढील कारवाई करतील, असेही सांगण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

हे समन्स शेअर करत आलियाने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तिने लिहिले आहे की, पोलिसांनी तिचा पती नवाजुद्दीन विरुद्ध दिलेल्या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष केले, परंतु आता लगेचच तिच्यावर गुन्हा दाखल केला. आलिया ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. 2010 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. आलिया आणि नवाजुद्दीनच्या आईमध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. (हेही वाचा: Tunisha Sharma Suicide Case: शीझान खानने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका; 30 जानेवारीला होणार सुनावणी)

कोरोना लॉकडाऊन दरम्यानही आलिया आणि नवाजुद्दीनमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर आलियाने नवाजुद्दीनवर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. 27 जुलै रोजी आलियाने पती नवाजुद्दीन, त्याचा भाऊ मिनाजुद्दीन, फैजुद्दीन, अयाजुद्दीन आ आई मेहरुनिशा इत्यादींविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. घटनेचे ठिकाण उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर असल्याने नंतर हे प्रकरण बुढाणा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. या तक्रारीत आलियाने नवाजुद्दीनचा भाऊ मिन्हाजुद्दीनवर विनयभंग आणि अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif