Nawazuddin Siddiqui Dream House: नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आलिशान घरात जास्त वेळ घालवू शकणार नाही, नवाजने सांगितले कारण

बहुतेक वेळ सेटवरच असतो, त्यामुळे सेटवरच राहावे लागते. त्यामुळे मी किती दिवस राहिल काय सांगु शकत नाही.

Nawazuddin Siddiqui Dream House (Photo Credit - Insta)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) नव्या आलिशान घरातील 'नवाब'चे (Nawab) फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुंबईतील 'ड्रीम हाऊस' पाहून (Nawazuddin Siddiqui Dream Home) चाहते खूप खूश आहेत. लोकांनी त्याचा संघर्ष पाहिला आणि ऐकला आहे, त्यामुळे आज नवाजला इथपर्यंत पोहोचल्यावर लोकांचा आदर आणखी वाढला आहे. नवाजच्या घराची रचना त्याच्या बुढाणा गावातील घरासारखी आहे. हा महाल बांधण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली. आता त्याने याबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने या घरासाठी कोणतेही नियोजन केले नव्हते. तो म्हणाला, 'खरं सांगू, मला नवीन घर हवंय असं काही मी ठरवलं नव्हतं. घर असणे या संकल्पनेवर माझा विश्वास नव्हता. कोणीतरी मला प्लॉट दाखवला म्हणून मी विचार केला की करूया कारण काही नुकसान नाही.'

नवाज पुढे म्हणाला, 'गोष्टी घडत राहिल्या आणि हे विकत घेतल्यानंतर मला समजले की मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये आर्किटेक्चर आणि सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला आहे. मी पहिल्या वर्षी सीनिक डिझाईनचाही अभ्यास केला. मला वाटले की ते कसे डिझाइन केले जाऊ शकते. माझी अंतिम संकल्पना अशी होती की ते जितके लहान असेल तितके जास्त परिणाम होतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

कोरोनामुळे लागला वेळ 

मुंबईच्या यारी रोडवर असलेले हे घर सुरू करून पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागली. कोरोना व्हायरसमुळे बराच वेळ वाया गेला. नवाजुद्दीन म्हणतो की हे घर बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली आहे आणि या प्रक्रियेदरम्यान जे लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत ते आपल्या भावना या घराशी जोडू शकतात, कारण त्याने खूप संघर्षानंतर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. (हे ही वाचा Prithviraj: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी)

घरासाठी तीन रंग वापरले

अभिनेता म्हणाला, 'घराबद्दल, इथेच तुम्ही विश्रांतीसाठी येतात. माझ्या आरामासाठी मी ते तसे केले आहे. मी घरात फक्त तीन रंग वापरले आहेत. तुम्हाला चौथा रंग कुठेही दिसणार नाही - लाकडी, पांढरा आणि स्काय ब्लू. एक बाग आणि एक केबिन आहे, जिथे मी माझी स्क्रिप्ट वाचेन आणि विचार करेन.

व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले आयुष्य

47 वर्षीय नवाज पुढे म्हणाला, 'अर्थात कठोर परिश्रम आहे आणि मी ते बनवले आहे. लोकांनी माझा संघर्ष कुठेतरी पाहिला असेल, कदाचित त्यामुळेच ते आनंदी असतील. त्या घरात मी किती दिवस राहीन माहीत नाही, कारण माझे अर्धे आयुष्य व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले आहे. बहुतेक वेळ सेटवरच असतो, त्यामुळे सेटवरच राहावे लागते. मात्र, नवाजुद्दीनने यावर काही तक्रार केली नाही. खरं तर, त्यांला व्यस्त रहायला आवडत आणि त्यांच्यासाठी काम अधिक महत्त्वाचे आहे असे तो म्हणतो आणि यामुळे त्याला अधिक आनंद होतो.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif