Navya Nanda: नव्या नंदाचे स्वप्न झाले साकार, फोटो शेअर करून दिली माहिती, अनेक कलाकारांकडून कौतुकाची थाप
ज्यात तिनं स्वप्न साकार झाल्याचे सांगितले आहे.
Navya Nanda: बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya ) हीनं नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं स्वप्न साकार झाल्याचे सांगितले आहे. नव्या हीनं चित्रपटसृष्टीत पाऊस न ठेवता दुसऱ्या करिअर निवडले आहे. तीनं स्वत: साठी वेगळं करिअर निवडलं आहे. हेही वाचा- राजकुमार रावने त्याच्या वाढदिवसानिमित्त 'मालिक'चा फर्स्ट लूक केला रिलीज
नव्या नंदाने शेअर केलेल्या फोटोत देशातील सुप्रसिध्द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे दिसत आहे. माहितीनुसार, तिला वडिलांप्रमाणे प्रसिध्द बिझनेसमन व्हायचे आहे. फोटो शेअर करत तीने पोस्ट लिहली की, माझं एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. देशातील सुप्रसिद्ध इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाला. त्याचबरोबर २०२६ पर्यंत या संस्थेतून शिक्षण घेणार. पुढची २ वर्षे... सर्वोत्कृष्ट लोक आणि प्राध्यापकांसह! फोटोमध्ये कॉलेजची झलक पाहायला मिळत आहे.
नव्या नंदाने शेअर केला फोटो
नव्या नंदाच्या चाहत्यांनी या फोटोवर कंमेट केले आहे. अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी तिचे कौतुक केले आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. एक म्हणजे तुम्ही भारतात शिक्षण घेत आहात आणि दुसरं नॉर्मल कोर्स करत आहात, नाहीतर तुम्ही एवढ्या मोठ्या कुटुंबात विचित्र कोर्सेस करता जे फार कमी लोक करतील.