National Film Awards 2019 Winners List: 'अंधाधुन' चित्रपटासह या चित्रपटांनी पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार, येथे पाहा पूर्ण यादी
ही घोषणा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे परीक्षक राहुल रवैल करत आहेत. यात वेगवेगळ्या विभागातील पुरस्कारांची घोषणा केली जात आहे.
66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ची घोषणा (66th National Film Awards)सुरु झाली आहे. ही घोषणा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे परीक्षक राहुल रवैल करत आहेत. यात वेगवेगळ्या विभागातील पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)साठीही आनंदाची बाब समोर आली आहे. त्याचा सुपरहिट चित्रपट 'अंधाधुन' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक एस राघवन (S Raghavan)यांनी केले होते. या चित्रपटात अभिनेत्री तब्बू, राधिका आपटे सह अनेक दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटाशिवाय संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'पद्मावत' सिनेमाला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर उरी फेम विक्की कौशल ची ब्लॉकब्लस्टर हिट चित्रपट 'उरी:सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड म्यूजिक म्हणून सन्मानित केले जाईल.
हेही वाचा- National Film Awards 2019: 'भोंगा' राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित
त्याशिवाय मराठी फिल्म 'भोंगा' ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरविण्यात येईल. त्याशिवाय राजस्थानी फीचर फिल्म 'टर्टल' ला सर्वोत्कृष्ट राजस्थानी फीचर चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार दिला जाईल.