NCB Raid at Arjun Rampal Home: ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपाल याच्या घरी एनसीबीचा छापा
याआधी अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड ग्रैब्रिएल डिमेट्रिएड्स च्या भावाला देखील ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता अर्जुनच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) समोर आल्यानंतर मुंबईत संशयित ठिकाणी NCB ची धाड टाकण्याची मोहिम जोरदार सुरु आहे. यात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर आली आहेत. त्यात आता आणखी एक नाव समोर आले आहे. अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्या मुंबईस्थित घरात NCB ने धाड टाकली असून यात अर्जुनच्या ड्रायव्हरला अधिक चौकशीसाठी अटक केली आहे. NCB ची टीम ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून यात आणखी बरीच नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड ग्रैब्रिएल डिमेट्रिएड्स च्या भावाला देखील ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता अर्जुनच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. हेदेखील वाचा- Drug Case: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची पार्टनर Gabriella हिच्या भावाला NCB कडून अटक
Narcotics Control Bureau conducts raid at the premises of actor Arjun Rampal in Mumbai
(file pic) pic.twitter.com/QZGj900hNb
— ANI (@ANI) November 9, 2020
आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, यांसह अनेक दिग्गज कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान मागील 2-3 दिवसात NCB ने मुंबईत 5 ठिकाणी धाड टाकली. यात अंधेरी, मालाड, खारघर, कोपरखैरणे आणि लोखंडवाला या ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील ड्रग्ज कनेक्शन हळूहळू समोर येत असून आणखी कोणाची नावे समोर येतील हे काही दिवसांतच कळेल.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्यानंतर एनसीबीकडून रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. तर जवळजळ एका महिन्यानंतर 7 ऑक्टोंबरला तिला बॉम्बे हायकोर्टाकडून जामिन मिळाला.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2020 01:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

