ईशा देओल ने आई हेमा मालिनी ला रुग्णालयात दाखल केल्याची अफवा असल्याचे सांगितले; ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती
त्यामुळे त्यांच्या तब्येतीसंबंधी ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत ते पूर्णपणे खोट्या असून अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच तुमचे प्रेम आणि तुमची चिंता लक्षात घेता तुम्हा सर्वांचे आभार" असेही तिने सांगितले आहे
सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे अनेक खोट्या बातम्या, अफवा अगदी झपाट्याने पसरत असल्याचे चित्र समोर आले आहे. यात आता एक अफवा झपाट्याने पसरत आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना रुग्णालयात दाखल केल्याची. ही बातमी ऐकून हेमा मालिनी यांचे असंख्य चाहते चिंतेत होते. मात्र त्यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) ने ही अफवा असल्याचे सांगितले आहे. ट्विटच्या माध्यमातून ईशाने याबाबत माहिती दिली आहे.
ईशा ने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,"माझी आई ड्रीमगर्ल पूर्णपणे बीर आणि ठणठणीत आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीसंबंधी ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत ते पूर्णपणे खोट्या असून अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच तुमचे प्रेम आणि तुमची चिंता लक्षात घेता तुम्हा सर्वांचे आभार" असेही तिने सांगितले आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो
खरे पाहता बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर हेमा मालिनी यांना देखील रुग्णालयात दाखल केल्याची बातमी व्हायरल होत होती. मात्र ही केवळ अफवा असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये असे ईशा देओल हिने सांगितले आहे.