Mumbai Police Summons Kangana Ranaut: मुंबई पोलिसांकडून कंगना रनौत हिच्यासह बहिण रंगोली चांडेल यांना समन्स, 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
चौकशीसाठी 10 नोव्हेंबरला हजर राहण्यास आदेश या दोघी बहिणींना देण्यात आले आहेत.
Mumbai Police Summons Kangana Ranaut: मुंबई पोलिसांनी कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तिची बहिण कंगना रनौत(Rangoli Chandel) ला समन्स (Summons) बजावलं आहे. या दोघी बहिणींना चौकशीसाठी 10 नोव्हेंबरला हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत. कोर्टाने सोशल मीडिया पोस्टद्वारे समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर कंगना आणि रंगोलीला समन्स बजावलं आहे. कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूचं ठेवलं होतं. वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी कंगना विरोधात कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांना 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.
कंगनाने मुंबईची तुलाना पाकव्याक्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेत तिच्यावर टीकांची तोफ डागली होती. त्यानंतर काही दिवस शिवसेना आणि कंगना यांच्यात शाब्दिक युद्ध चालूचं होतं. त्यानंतर महानगरपालिकेने तिचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले होते. त्यानंतर कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भटे घेऊन न्याय देण्याची मागणी केली होती. (हेही वाचा - Complaint against KBC: अमिताभ बच्चन, Sony TV यांच्या विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत तक्रार, कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील प्रश्नावरुन वाद)
गेल्या महिन्यात देशभरात कृषी कायद्यांच्या विरोधात वातावरण पेटले होते. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात आंदोलन केली. त्यानंतर कंगनाने यासंदर्भातही वादग्रस्त ट्विट केलं होतं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवणारे तसेच, दंगल घडवणारेच हेच लोक आता कृषी विधेयकांवर चुकीची माहिती पसरवत आहेत. हे लोक देशात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असं कंगनाने म्हटलं होतं. त्यानंतर वकील एल. रमेश नाईक यांनी यासंदर्भात कर्नाटकातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी मुंबई पोलिसांना कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कंगनावर या प्रकरणी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, कंगनाने समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना यासंदर्भात तपास करण्याचे आदेश दिले होते.