मुंबई पोलिसांनी दहशतवादी म्हणून केली अटक; मात्र ते होते हृतिक रोशन याच्या सिनेमातील कलाकार!
मात्र नंतर ते सिनेमातील कलाकार असल्याचे समोर आले.
मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक केली. मात्र नंतर ते दोघेही सिनेमातील कलाकार असल्याचे समोर आले. टीव्ही 9 गुजराती यांनी ही बातमी फोटोसह ट्विट करत लिहिले की, "तासाभराच्या सर्च ऑपरेशननंतर मुंबई पोलिसांनी दोन व्यक्तींना दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक केली. मात्र नंतर हे दोघेही हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी अॅक्शन सिनेमातील ज्युनिअर ऑर्टिस्ट असल्याचे लक्षात आले."
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना दोन व्यक्ती वसई भागात भटकताना दिसल्या. ते दोघेही फिरत होते आणि सिग्रेट्स खरेदी करत होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी काही प्रयत्नांनी त्या दोघांना पकडले. मात्र ते दोघेही ज्युनिअर आर्टिस्ट असल्याचे निदर्शनास आले. त्या दोघांच्याही सुटकेसाठी सिनेमाच्या निर्मात्या युनिटला काही कागदपत्रं पोलिसांसमोर सादर करावी लागली. त्या कागदपत्रानुसार ते दोघेही बलराम गिनावाला (23) आणि अरबाज खान (20) असल्याची ओळख पटली. तत्पूर्वी त्या दोन्ही कलाकारांना दंड संहिता कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली होती.
TV9 गुजराती ट्विट:
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी सिनेमात एकत्र काम करत आहे. सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही.
त्यापूर्वी टायगर श्रॉफ 'स्टुडन्ट ऑफ द इअर 2' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर हृतिक रोशन याचा 'सुपर 30' हा सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.