मुंबई: अभिनेत्री किम शर्मा हिच्याविरोधात तक्रार दाखल; पगार थकवून धमकवल्याने मोलकरणीची पोलिसांत धाव
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) हिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोलकरणीचा महिन्याभराचा पगार थकवल्याने गुरुवारी (18 एप्रिल) मोलकरणीने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नम्रता सोळंकी (Namrata Solanki) असे मोलकरणीचे नाव असून तिने मुंबईतील खार पोलिस स्टेशनात किम शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे.
किमकडे महिन्याभराच्या पगाराची मागणी केली असता दिवसभर थांब तरच पगार मिळेल, असे नम्रताला सांगण्यात आले. त्यास तिने नकार दिल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही किमने दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. (मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने फॅशन डिझायनरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार)
या प्रकरणी किम शर्मा विरोधात अदखलपात्र गुन्हाची नोंद झाली असून पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement