सिनेमा तिकिटावरील GST कमी केल्याच्या निर्णयाचं Karan Johar, Ajay Devgan, Anil Kapoor कडून स्वागत, Twitter वर मानले मोदी सरकारचे आभार

नव्या कर रचनेनुसार आता 100 रुपयांपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावर 12 % आणि 100 रुपयाच्या वरील सिनेमा तिकिटावर 18 % जीएसटी आकाराला जाणार आहे

GST on Movie Tickets Slashed (Photo Credit-IANS)

100 रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या सिनेमाच्या तिकिटांवर आता 28 ऐवजी 18 % जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सिनेमाची तिकिटं आता थोडी स्वस्त होण्याची शक्य आहे. नुकत्याच पार  पडलेल्या GST Council Meet मध्ये सुमारे 33 गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे. च्या सर्वोच्च श्रेणी म्हणजे 28 % च्या ब्रॅकेट असलेली तिकीट आता 18 % वर आल्याने बॉलिवूड सेलिब्रिटींदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनिल कपूर, कारण जोहर, अनुपम खेर,अजय देवगण,  अक्षय कुमार आदी कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाचं स्वागत करत मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.33 वस्तूंवरील GST मध्ये कपात, नवीन दर 1 जानेवारी 2019 पासून लागू- अर्थमंत्री अरुण जेटली

The reduction of GST on cinema tickets is a welcome relief to both cinemamakers & cinemagoers. Tickets under Rs. 100 to be taxed at 12% (instead of 18%), tickets over Rs. 100 to be taxed at 18% (instead of 28%). Thanks for heeding the voices of the people @narendramodi ji! 🙏🏽 pic.twitter.com/L0Lt8nMxiG

 

 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बॉलिवूड कलाकारांची एक खास मिटिंग पार पडली होती. यामध्ये बॉलिवूड उद्योगाला नुकसानकारक ठरणाऱ्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली होती. नव्या कर रचनेनुसार आता 100 रुपयांपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावर 12 % आणि 100 रुपयाच्या वरील सिनेमा तिकिटावर 18 % जीएसटी आकाराला जाणार आहे.