Movie Releases in February: Gehraiyaan पासून Gangubai Kathiawadi पर्यंत हे चित्रपट फेब्रुवारीमध्ये चित्रपटगृह आणि ओटीटीवर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटगृहात आणि ओटीटीवर एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दीपिका पदुकोणपासून ते भूमी पेडणेकर, आलिया भट्ट आणि तापसी पन्नूपर्यंत हा चित्रपट या महिन्यात रिलीज होणार आहे.

Gehraiyaan and Gangubai-Kathiawadi (Photo Credit - Insta)

कोरोना (Corona) रुग्णसंख्येचा वेग मंदावल्याने सिनेचित्रपटसृष्टित चित्रपटांच्या प्रदर्शनाचा वेग वाढला आहे. बाॅलिवूड (Bollywood) मधील अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा (Movies Release Date) जाहीर झाल्या आहे. दरम्यान, प्रत्येक वेळी बॉलीवूडसाठी फेब्रुवारी महिना खास असतो कारण प्रजासत्ताक दिनापासूनच मेगा बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाला सुरुवात होते. अनेक चित्रपट निर्माते व्हॅलेंटाईन डेच्या आसपास चित्रपट प्रदर्शित करतात. यावेळी फेब्रुवारी महिना प्रेक्षकांसाठी चित्रपट महोत्सव घेऊन येत आहे. चित्रपटगृहात आणि ओटीटीवर एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दीपिका पदुकोणपासून ते भूमी पेडणेकर, आलिया भट्ट आणि तापसी पन्नूपर्यंत हा चित्रपट या महिन्यात रिलीज होणार आहे.

फ्रेबुवारीमधील प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची यादी:

गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीची नवीन प्रदर्शनाची डेट जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे 24 फेब्रुवारीला संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते आणि आता ही प्रतीक्षा संपणार आहे.

गेहरायान (Gehraiyaan)

दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या 'गेहरायान'चे प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. दीपिका पदुकोण या चित्रपटाद्वारे OTT वर पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला खूप पसंती मिळत आहे. चित्रपटात दीपिकाने सिद्धांत चतुर्वेदीसोबत असंख्य किसिंग सीन्स दिले आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

बधाई दो (Badhai do)

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो' हा चित्रपटही 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे 'बधाई दो' ओटीटीवर नाही तर सिनेमागृहात धडकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यावरून चित्रपटाची कथा कळते. या चित्रपटात भूमी पेडणेकर लेस्बियन तर राजकुमार राव गे झाला आहे. दोघेही लग्न करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

लूप लपेटा (Loop Lapeta) 

तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन अभिनीत लूप लपेटा 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांऐवजी नेटफ्लिक्सवर येणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर असून त्याला पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)