Mithun Chakroborty Birthday: सुशांत सिंह राजपूत चे निधन व कोरोनामुळे यंदा मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मात्र सध्या कोरोनामुळे (COVID 19) व सुशांत सिंह राजपुत (Sushant Singh Rajput) याचे नुकतेच निधन झाल्याने एकूण परिस्थितीचे भान राखत यंदा आपण वाढदिवसच साजरा न करण्याचा निर्णय मिथुन यांनी घेतला आहे.

Mithun Chakraborty, Sushant Singh Rajput (Photo Credits: Wikimedia Commons, Instagram)

बॉलिवूडचे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakroborty) यांचा आज 16 जून रोजी वाढदिवस आहे. एकेकाळी आपल्या डान्सिंग मूव्हज ने हजारोंना भुरळ घालणाऱ्या दादा ने आज वयाच्या 70 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने वास्तविक मोठी पार्टी करण्याची त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती मात्र सध्या कोरोनामुळे (COVID 19) देशावर ओढवलेली परिस्थिती अशातच बॉलिवूड मधील एक तरुण कलाकार म्हणजेच सुशांत सिंह राजपुत (Sushant Singh Rajput)  याचे नुकतेच निधन या एकूण परिस्थितीचे भान राखत यंदा आपण वाढदिवसच साजरा न करण्याचा निर्णय मिथुन यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आज घडीला बॉलिवूड मधील कलाकार बाहेरून येणाऱ्या कलाकाराला स्वीकारत नाहीत म्हणून सुशांतने आत्महत्या केल्याच्या चर्चा सुरु आहेत तेव्हा मिथुन चक्रवर्ती यांचा हा निर्णय विशेष ठरत आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी याने सांगितल्याप्रमाणे, कोविड 19 च्या साथीच्या आजाराची स्थिती आणि आमचा प्रिय सहकारी सुशांतच्या अकाली निधनाची स्थिती पाहता यावर्षी मी आणि माझ्या वडिलांनी वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशन न करण्याचे ठरवले आहे तसेच सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित राहावे, आपल्या कुटुंब व मित्रमंडळींसोबत वेळ घालवावा असे आवाहनही नमाशी यांनी केले आहे. Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचे हॅशटॅग काही वेळापासून ट्विटर वर ट्रेंड होत आहे. मात्र हे ट्रेंडिंग हॅशटॅग बघून नेटकऱ्यांचा भलताच गैरसमज झाला होता. मागील काही दिवसात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्या फॅन्सना धक्का देत जगातून एग्झिट घेतली त्याव्व्हल्स अचानक असे धक्के देणारे हॅशटॅग ट्रेन व्हायचे. आता मिथुन यांच्या नावाचा हॅशटॅग पाहूनही सुरुवातीला अनेक जण घाबरून गेले होते मात्र नंतर त्यांच्या वाढदिवसाविषयी कळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आणि त्यांच्या आयुष्य व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.