Shabaash Mithu Trailer: 'मिताली राज'चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर, ‘शाबास मिथू’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्हाला नाव माहित आहे, आता मितालीला लीजेंड बनवण्यामागील कथा पाहण्यासाठी तयार व्हा. “द जेंटलमन्स गेम” ची नव्याने व्याख्या करणाऱ्या महिलेची कथा तुमच्यासमोर आणताना मला सन्मान वाटतो. ‘शाबास मिथू’ 15 जुलै.

Shabaash Mithu Trailer (Photo Credit - Twitter)

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार 'मिताली राज' (Mithali Raj) हिच्या बायोपिक 'शाबाश मिथू'चा ट्रेलर (Shabaash Mithu Trailer) रिलीज झाला आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे.  15 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार्‍या या चित्रपटात मिताली राजच्या बालपणापासून ते क्रिकेटपटू बनण्यापर्यंतच्या संघर्ष दाखवण्यात येणार आहे. मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 वर्षांची कारकीर्द आहे. त्याने अनेक विक्रम मोडीत काढत एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. ट्रेलरची सुरुवात मिताली राजच्या क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांनी होते. तापसीने तिच्या सोशल हँडलवर ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्हाला नाव माहित आहे, आता मितालीला लीजेंड बनवण्यामागील कथा पाहण्यासाठी तयार व्हा. “द जेंटलमन्स गेम” ची नव्याने व्याख्या करणाऱ्या महिलेची कथा तुमच्यासमोर आणताना मला सन्मान वाटतो. ‘शाबास मिथू’ 15 जुलै.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

जबरदस्त ट्रेलर

आता ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, 2 मिनिटे 24 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मिताली राजचे बालपणापासून ते 23 वर्षांपर्यंतचे क्रिकेट करिअर अतिशय शानदार पद्धतीने दाखवण्यात आले आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक इमोशनल सीन्सही पाहायला मिळतात. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही निःसंशयपणे म्हणाल की पुरुषांच्या वर्चस्वाच्या खेळात महिलांसाठी प्रवेश करणे खरोखर कठीण होते. पण मितालीने ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. ट्रेलरमध्ये तापसी तिच्या उत्कटतेसाठी कुटुंब, समाज यांच्या विरोधात खंबीरपणे उभी असल्याचे दाखवण्यात आले आहे. (हे देखील वाचा: अक्षय कुमारने शेअर केले Raksha Bandhan नवे पोस्टर, 'या' दिवशी चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज)

हा चित्रपट मिताली राजच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स ड्रामा

मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 वर्षांची कारकीर्द आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत, अनेक विक्रम मोडले आहेत.या चित्रपटात मिताली राजच्या आयुष्यातील चढ-उतार, अपयश चांगल्या प्रकारे दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात तापसीशिवाय विजय राज देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा प्रिया अवेनने लिहिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now