Mission Mangal ची बॉक्स ऑफिसवर धूम, पहिल्या दिवशी भरघोस कमाई; अक्षय कुमारच्या करियर मधील नवा विक्रम

यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) व विद्या बालन (Vidya Balan) स्टारर चित्रपट मिशन मंगल बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

मिशन मंगल (Photo Credits: Twitter)

Mission Mangal Box Office Collection: यावर्षी स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने देशात मोठी धामधूम होती. या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित मिशन मंगल (Mission Mangal) आणि बाटला हाउस हे दोन चित्रपट तर सेक्रेड गेम्स या वेबसीरीजचा 2 रा सीझन प्रदर्शित झाला. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) व विद्या बालन (Vidya Balan) स्टारर चित्रपट मिशन मंगल बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 29.16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे बाटला हाउसची पहिल्या दिवसाची कमाई 14.59 कोटी इतकी ठरली आहे.

भारताच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेची कहाणी ‘मिशन मंगल’च्या रुपात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या चित्रपटाला चाहत्यांनी पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मिशन मंगल हा अक्षय कुमारच्या करियरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई (Biggest Opener To Date) करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच याधीही स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या सर्वांमध्येही पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये मिशन मंगलने बाजी मारली आहे. (हेही वाचा: 'Mission Mangal' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार-विद्या बालन मध्ये झाला राडा, पाहा व्हायरल व्हिडिओ)

स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेले अक्षय कुमारचे चित्रपट –

या चित्रपटात अक्षय कुमारसह  विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विक्रम गोखले, शर्मन जोशी, नित्या मेनन, किर्ती कुल्हेरी, दलिप ताहिल अशा कलाकारांची मांदियाळी प्रमुख भूमिकेत आहे. जगन शक्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान येत्या वीकएंडला या चित्रपटाच्या कमाईमध्ये अजून भर पडेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.