पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकसाठी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर घेणार अभिनयाचे धडे
मिस वर्ल्ड 2017 च्या विजेतेपदावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे
मिस वर्ल्ड 2017( Miss World 2017) च्या विजेतेपदावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ह्या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी ह्या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तसेच यशराज फिल्म्स च्या बॅनरखाली हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. ह्या चित्रपटाची शूटिंग ह्या वर्षाच्या दुस-या टप्प्यात सुरु होईल.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “मिस वर्ल्ड किताब जिंकलेल्या मानुषीचे अनेक चाहते आहेत, ती केवळ सुंदर नसून एक उत्कृष्ट परफॉर्मर आहे.” मानुषी ह्या चित्रपटात संयुक्ता ची भूमिका साकारणार आहे. तसेच ती खिलाडी अक्षय कुमार सोबत रोमान्सही करताना दिसणार आहे. मानुषी आपल्या डेब्यूसाठी विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी ती ब-याच कार्यशाळेत अभिनयासोबत नृत्याचे धडे घेत आहेत.
मानुषी छिल्लरच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी ह्याआधीही अनेक बातम्या आपल्या कानावर येत होत्या. मध्यंतरी अशी ही चर्चा रंगली होती की, मानुषी फराह खानच्या फिल्ममध्ये डेब्यू करेल. इतकच नव्हे तर ह्या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंह दिसणार असल्याचंही सांगण्यात येत होतं.
मनुषी छिल्लर हिला फराह खान बॉलिवूडमध्ये आणणार?
ह्या आधी अभिनेता अक्षय कुमारला अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना आपण पाहिले. मात्र आता मानुषी आणि अक्षयची जोडी प्रेक्षक किती पसंत करतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.