Malayalam Actor Nirmal Benny Dies: मल्याळम अभिनेते निर्मल बेनीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 37 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Malayalam Actor Nirmal Benny (फोटो सोजन्य - इन्स्टाग्राम)

Malayalam Actor Nirmal Benny Dies: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपट अभिनेता निर्मल बेनी (Malayalam Actor Nirmal Benny) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निर्मलने लिजो जोस पेलिसरीच्या 'आमेन' चित्रपटात कोचनची भूमिका साकारली होती. या अविस्मरणीय भूमिकेसाठी तो प्रसिद्धीझोतात आला होता. निर्माता संजय पडियूर यांनी त्यांच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर करत संजय पडियूर यांनी लिहिले की, 'जड अंत:करणाने मला माझ्या प्रिय मित्राचा निरोप घ्यावा लागत आहे... निर्मल हा कोच्छा, अमेनी धरम या चित्रपटाचा गौरव होता. हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी त्यांचे निधन झाले. माझ्या प्रिय मित्राच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी देवाला प्रार्थना करतो. सोशल मीडियावरही अभिनेते निर्मल बेनी यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा -Insha Ghaii Kalra’s Husband Ankit Kalra Tragically Passes Away: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर इशा घई कालरा यांचे पतीचे निधन)

निर्मल बेणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Padiyoor (@sanjaypadiyoor)

निर्मल बेनी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून केली होती, परंतु त्यांना ओळख YouTube व्हिडिओ आणि स्टेज परफॉर्मन्सद्वारे मिळाली. त्याने 2012 मध्ये 'नवगाथार्कू स्वागतम' मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत, बेनीने 5 चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यापैकी सर्वात प्रसिद्ध 'आमेन' आणि 'डूरम' आहेत.