Malaika Arora चा झगमगता ड्रेस पाहून चाहत्यांनी केले ट्रोल, ख्रिसमस ट्री, डिस्को बॉल ची दिली उपमा

यामधील तिचा फॅशन स्टाईल पाहून लोकही बुचकळ्यात पडले आहेत. एवढच नव्हे यात तिचा विचित्र फॅशन सेन्स पाहून नेटक-यांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

Malaika Arora चा झगमगता ड्रेस पाहून चाहत्यांनी केले ट्रोल, ख्रिसमस ट्री, डिस्को बॉल ची दिली उपमा
Malaika Arora (Photo Credits: Yogen Shah)

फॅशन डिवा, फिटनेस फिक्र असलेली बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मलायका पार्टीज, मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्येही बरीच दिसते. त्यामुळे प्रत्येक वेळी तिचा वेगवेगळा फॅशन सेन्स पाहायला मिळतो. ती अनेक रिअॅलिटी शो मध्ये परीक्षक म्हणून दिसली आहे. मात्र तेव्हाही तिचा अफलातून फॅशन सेन्स पाहायला मिळतो. मात्र नुकताच तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामधील तिचा फॅशन स्टाईल पाहून लोकही बुचकळ्यात पडले आहेत. एवढच नव्हे यात तिचा विचित्र फॅशन सेन्स पाहून नेटक-यांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

मलायका अरोरा या फोटोमध्ये चंदेरी आणि लाल रंगाच्या पट्ट्ट्यांचा झगमगता स्कर्ट, चंदेरी रंगाचे बूट आणि वर चंदेरी रंगाचे जॅकेट्स घातले आहेत. हे पाहून नेटक-यांनी तिला ट्रोल केले आहे.हेदेखील वाचा- Taimur Ali Khan: फोटो काढणा-या मिडियावर भडकला तैमूर अली खान, 'या' शब्दांत दिली सक्त ताकीद, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

मलायकाच्या या फोटोखाली नेटक-यांनी तिला ख्रिसमस ट्री, डिस्को बॉल असे कमेंट्स दिल्या आहेत. या फोटोमध्ये मलायका खूपच झगमगती दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

याचा एक व्हिडिओ पण योगेन शहा यांनी केला आहे. त्यात ती अभिनेत्री करीना कपूरसह दिसत आहे. करीना आपल्या बेबी बंप छान फाँल्ट करताना दिसत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2020 03:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).