Actor Shah Rukh Khan Death Threats: अभिनेता शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून Y+ सुरक्षा प्रदान
तेव्हापासून तो वादाच्या भोवर्यात आहे
अभिनेता सलमान खान पाठोपाठ आता किंग खान शाहरूख खानला (Shah Rukh Khan) देखील जीवे मारण्याच्या धमक्या (Death Threats) आल्या आहे. याबाबत शाहरूखने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता शाहरूखला वाय प्लस दर्जाची सुविधा दिली जात आहे. धमकी प्रकरणी किंग खानने पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार केली आहे. 'जवान' आणि 'पठाण' सिनेमांनंतर त्याला ही धमकी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
शाहरूखच्या सुरक्षेत आता त्याच्या खाजगी बॉडीगार्ड्ससह राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या सहा प्रशिक्षित कमांडोची टीम असेल. एमपी गन, एके-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुल त्यांच्याजवळ असतील. सोबतच शाहरूखच्या घरावर 4 पोलिस कर्मचार्यांचा चोविस तास पहारा असणार आहे. प्रशिक्षित कमांडो सोबत त्याच्या ताफ्यात ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन असेल. यामुळे शाहरुखच्या गाडीसमोर कोणीलाही येता येणार नाही. नक्की वाचा: Shah Rukh Khan On Dunki: शाहरूख खानने सांगितली 'डंकी'ची रिलीज डेट .
'पठाण' या सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून तो वादाच्या भोवर्यात आहे. पण त्याचे दोन्ही सिनेमे यंदा हीट ठरले आहेत. शाहरुख खानच्या "जवान" ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1103.27 कोटी रुपयांची कमाई केली. तर हा जागतिक स्तरावर 1100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.