Mud Mud Ke Song out: 365 Days स्टार Michele Morrone आणि Jacqueline Fernandez ची नवीन गाण्यात लव्ह केमिस्ट्री, पहा व्हिडिओ
या गाण्याने रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षक आणि श्रोत्यांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण केली होती आणि ज्यांनी या गाण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे.
Mud Mud Ke Song Out: काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चे 365 Days फेम अभिनेता मिशेल मोरॉन (Michele Morrone) सोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी हे दोघे गाण्याच्या व्हिडिओमध्ये एकत्र येणार असल्याची चर्चा होती. तेव्हापासून चाहत्यांना चांगलीचं उत्सुकता लागली होती. या गाण्याचा टीझर प्रचंड हिट झाला असून आता 'मुड मुड के' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात जॅकलिन आणि मोरॉनची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मोरॉन त्याच्या रोमँटिक अवतारासाठी जगभरात ओळखला जातो. आता या गाण्यातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तो पहिल्यांदाच भारतीय प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
मिशेल हा खूप लोकप्रिय अभिनेता आहे. '365 डेज' या चित्रपटातून त्याला जगभरात ओळख मिळाली. भारतातही त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. या गाण्यात जॅकलीनसोबतची त्याची जबरदस्त लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे, दोघांमधील जबरदस्त इंटिमेट सीन्सही आहेत. मोरॉन आणि जॅकलीन हे दोघेही त्यांच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांची ही लोकप्रियता हे गाणे अधिक लोकप्रिय आणि खास बनवत आहे. या गाण्यामुळे मोरॉनच्या चाहत्यांना आशा आहे की, तो लवकरच बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटातही दिसण्याची शक्यता आहे. (वाचा - Alia Bhatt Photos: कानात झुमके, कपाळावर बिंदी लावून आलिया भट्टने चाहत्यांना लावले वेड, पांढऱ्या साडीतील 'हे' फोटोज सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल)
Mikel Morrone ची जगभरात प्रचंड क्रेझ -
मोरॉनच्या '365 डेज' चित्रपटाने खळबळ उडाली आहे. मुलींमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. तो एक इटालियन अभिनेता आहे. परंतु, त्याच्या उत्कृष्ट रोमँटिक अभिनय कौशल्यासाठी तो जगभरात ओळखला जातो. त्याचबरोबर जॅकलीन भारत आणि श्रीलंकेसह अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचे मुड मुड के गाणे सध्या खूपचं व्हायरल होत आहे. देसी म्युझिक फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनलवर हे रिलीज करण्यात आले आहे. याला टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी आवाज दिला आहे.
'मुड मुड के'च्या रिलीजबद्दल बोलताना मिकेल मोरोन म्हणतात, "माझ्या पदार्पणाची वाट पाहणाऱ्या भारतावर माझे खूप प्रेम आहे आणि ती प्रतीक्षा आता इथेच संपते. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मला आशा आहे की, मी जेवढे गाणे एन्जॉय केले तेवढेच ते गाणे एन्जॉय करत असतील."
या गाण्याला आपला जादुई आवाज देणारी गायिका नेहा कक्कर म्हणते की, मुड मुड के'वर काम करणे खूप छान होते. या गाण्याने रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षक आणि श्रोत्यांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण केली होती आणि ज्यांनी या गाण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. हे गाणे आता रिलीज झाले आहे. आम्हाला खात्री आहे की, ते लोकांना नक्की आवडेल.