Lalit Modi Sushmita Sen Dating: सुष्मिता सेनच्या आयुष्यात ललित मोदींच्या रूपाने नवे प्रेम; रोमँटिक फोटो पोस्ट करत केले जाहीर, लवकरच करणार लग्न (See Photos)

47 वर्षीय सुश्मिता सेन 57 वर्षांच्या ललित मोदी यांच्या प्रेमात पडली आहे. नुकतेच मोदींनी सोशल मीडियावर माजी मिस युनिव्हर्ससोबत काही रोमँटिक छायाचित्रे शेअर करत, ते दोघे एकत्र असल्याची पुष्टी केली आहे.

Lalit Modi and Sushmita Sen (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. गेली अनेक वर्षे सुष्मिता सेन आणि रोहमन (Rohman Shwal) एकमेकांसोबत नात्यामध्ये होते. रोहमन हा सुश्मिता आणि तिच्या कुटुंबासोबतच राहत होता, मात्र मागच्या वर्षी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता माहिती मिळत आहे की, सुष्मिता सेन आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांना डेट करत आहे. होय, ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल मात्र हे खरे आहे. 47 वर्षीय सुश्मिता सेन 57 वर्षांच्या ललित मोदी यांच्या प्रेमात पडली आहे. नुकतेच मोदींनी सोशल मीडियावर माजी मिस युनिव्हर्ससोबत काही रोमँटिक छायाचित्रे शेअर करत, ते दोघे एकत्र असल्याची पुष्टी केली आहे. रोहमनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच सुश्मिताच्या आयुष्यात नवे प्रेम आले आहे.

ललित यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये ललित मोदींनी सुष्मिताला 'बेटर हाफ' असे संबोधून एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. यानंतर लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा अंदाज लावला. पहिल्या ट्विटमध्ये ललित यांनी लिहिले, 'कुटुंबासह मालदीव, सार्डिनिया टूर संपवून लंडनला परतलो. माझ्या बेटर हाफसोबत एक नवी सुरुवात... एक नवीन आयुष्य. आज मी चंद्रावर आहे.' ललित यांचे हे ट्विट सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल झाले आणि लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा समज करून घेतला. मात्र, या ट्विटनंतर ललित मोदींनी आणखी एका ट्विटमध्ये स्पष्ट केले की, या दोघांनी लग्न केलेले नाही, तर दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

अलीकडेच सुष्मिता सेनने लग्नावर भाष्य केले होते, ज्याची बरीच चर्चा झाली होती. सुष्मिता अनेक रिलेशनशिपमध्ये होती, पण ती अद्याप लग्नाच्या बंधनात अडकली नव्हती. लग्न न करण्यावर तिने म्हटले होते की, 'मी 3 वेळा लग्न करण्याच्या खूप जवळ होते पण देवाने मला वाचवले.' दुसरीकडे ललित मोदी यांचे जवळ जवळ 10 वर्षे मोठ्या असलेल्या मीनल सोबत 1991 मध्ये लग्न झाले होते. 2018 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. (हेही वाचा: Daler Mehndi Sentenced Jail: लोकप्रिय गायक दलेर मेहंदीला 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; मानवी तस्करी प्रकरणात झाली अटक)

दरम्यान, ललित मोदींनी आयपीएलची सुरुवात केली होती.  ते 2005 ते 2010 पर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. 2008 ते 2010 या काळात ते आयपीएलचे अध्यक्ष आणि आयुक्त होते. 2010 मध्ये ललित मोदींना हेराफेरीच्या आरोपावरून आयपीएल आयुक्तपदावरून निलंबित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना बीसीसीआयमधूनही निलंबित करण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप झाल्यानंतर ललित मोदी 2010 मध्ये देश सोडून पळून गेला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now