KRK ने सांगितले अक्षय कुमार चे भविष्य, म्हणाला, 'पैसे कमावण्यासाठी अभिनेत्याकडे 2-3 वर्ष शिल्लक'

कमाल राशिद खानने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

KRA and Akshay Kumar (Photo Credits: FB)

आपल्या सडेतोड आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेला अभिनेता कमाल खान (Kamal Khan) सध्या त्याच्या नव्या विधानामुळे चर्चेत आहे. यावेळी त्याने चक्क बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याला टार्गेट केले आहे. "अक्षय कुमारकडे पैसे कमावण्यासाठी 2-3 वर्ष शिल्लक राहिले असून काही वेडे निर्माते चित्रपटासाठी 125 कोटी रुपये देतात" असे ट्विटद्वारे म्हटले आहे. कमाल राशिद खानने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कमालने ट्वीटमध्ये अक्षयकडे आता पैसे कमावण्यासाठी दोन ते तीनवर्षच शिल्लक असल्याचे म्हटले आहे. 'अक्षय कुमारच्या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी कोणी मिळत नाही. त्याचा सूर्यवंशी आणि बेलबॉटम चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. तो एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची घोषण करतोय. कारण आता पैसे कमावण्यासाठी अक्षयकडे 2 ते 3 वर्षच शिल्लक आहेत. वेडे निर्माते त्याला चित्रपटासाठी 125 कोटी रुपये देतात' या आशयाचे ट्वीट केले आहे.हेदेखील वाचा- Ram Setu Muhurat: अक्षय कुमार सह 'राम सेतु' चित्रपटाच्या टीम ने अयोध्येत जाऊन केला सिनेमाचा शुभारंभ

पाहा ट्विट:

केआरकेच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर तू अक्षय कुमारवर जळतोस का? असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुला काय वाटते हे कोणी विचारले आहे का? असे म्हणत सुनावले आहे.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अक्षयचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळते. 'सूर्यवंशी', 'बच्चन पांडे', 'बेलबॉटम' हे अक्षय कुमारचे चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.



संबंधित बातम्या

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Lunch Break: दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 गडी गमावून 104 धावा, जसप्रीत बुमराहने घेतल्या 2 विकेट, सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा

AFG vs ZIM 2nd T20I Match 2024 Scorecard: अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 50 धावांनी केला पराभव, रशीद खानने केली घातक गोलंदाजी; मालिका 1-1 अशी बरोबरीत

MUM Beat BRD, SMAT 2024 Semi Final 1 Scorecard: मुंबईचा बडोद्यावर 6 विकेट्सने विजय; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंजिक्य रहाणेच्या शानदार 98 धावा

Mumbai vs Baroda Semi Final Live Streaming: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आज मुंबईसमोर बडोदाचे आव्हान, पाहा कुठे पाहू शकता सामन्याच लाईव्ह स्ट्रिमींग