IPL Auction 2025 Live

Krishnakumar Kunnath 'KK' Google Doodle: कृष्णकुमार कुन्नथ 'केके' यांच्या स्मरणार्थ गूगल वर खास डूडल

1996 मधील गुलजार यांंच्या ' माचिस' या फीचर फिल्म मधील 'छोड आये हम' हे त्यांचं पहिलं गाणं आहे.

Singer KK | Google

गूगलच्या होमपेजवर आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक K.K अर्थात कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत खास गूगल डूडल साकारण्यात आलं आहे. के के यांनी मराठी, मल्याळम, तेलगू, बंगाली अशा अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये गायन केले आहे.  1996 मधील गुलजार यांंच्या ' माचिस' या फीचर फिल्म मधील 'छोड आये हम' हे त्यांचं पहिलं गाणं आहे. ' खुदा जाने' 'बिते लम्हे' ही त्यांची गाणीही विशेष गाजली आहेत.

Krishnakumar Kunnath यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 चा आहे. दिल्लीमध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी Kirori Mal College of Delhi University मध्ये शिक्षण घेतलं. गायन क्षेत्रात करियर करण्यापूर्वी त्यांनी काही काळ मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम केले. 1999 मध्ये के के यांनी हम दिल दे चुके सनम मध्ये 'तडप तडप' गाण्यातून त्यांचं बॉलिवूड मध्ये दमदार पदार्पण झालं. त्याच वर्षी त्यांनी त्यांचा पहिला सोलो अल्बम 'पल' काढला. तोही सुपरहिट झाला होता. यामधील 'यारो' हे गाणं फ्रेंडशीप साठी अ‍ॅन्थम बनलं आहे.

के के यांच्या कारकिर्दीत,त्यांच्या अष्टपैलु आवाजामुळे त्यांना हिंदीमध्ये 500 हून अधिक गाणी आणि तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळममध्ये 200 हून अधिक गाणी गाण्याची संधी मिळाली. त्यानी 11 भाषांमध्ये 3,500 जिंगल्स देखील सादर केल्या, ज्यामुळे भारतातील सर्वात प्रसिद्ध पार्श्वगायकांपैकी एक म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले.

कोलकाता मध्ये एका कॉन्सर्ट नंतर त्यांचे 53 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. त्यांची शेवटची कॉन्सर्ट कोलकाता मध्ये झाल्याने तेथे त्यांच्या स्मरणार्थ एक पुतळा उभारण्यात आला आहे. 31 मे 2022   मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संगीत विश्वातला एक तारा निखळला.