कोलकत्ता येथील दुर्गा मातेच्या मंडळात सोनू सूद चा पुतळा; कौतुकाने भारावला अभिनेता (View Tweet)
यात स्थरांतरीत मजूरांचा विषय प्रामुख्याने मांडला आहे.
कोलकाता (Kolkata) येथील एका दुर्गा मंडळामध्ये (Durga Pandal) कोविड-19 लॉकडाऊन (Covid-19 Lockdown) च्या थीमवर यंदा सजावट करण्यात आली आहे. यात स्थरांतरीत मजूरांचा विषय प्रामुख्याने मांडला आहे. स्थरांतरीत मजूरांचा विषय निघताच सोनू सूद (Sonu Sood) याला विसरुन कसे चालेल? लॉकडाऊनच्या काळात स्थरांतरीत मजूरांना सर्वोतोपरी मदत करणाऱ्या सोनू सूद याच्या सन्मानार्थ त्याचा पुतळा मंडळात स्थापित करण्यात आला आहे. प्रफुल्ल कानन वेल्फेअर असोसिएशन (Prafulla Kanan Welfare Association) हा अनोखा निर्णय घेतला आहे.
गरजूंना मदत करण्याची प्रेरणा लोकांना मिळावी यासाठी सोनू सूद पुतळा मंडळात उभारण्यात आल्याचे प्रफुल्ल कानन वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य श्रींजय दत्ता (Srinjay Dutta) यांनी सांगितले. दरम्यान या कौतुकाने अभिनेता सोनू सूद अगदी भारावून गेला आहे. त्याने ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, "आतापर्यंतचा माझा सर्वात मोठा पुरस्कार." (Sonu Sood Felicitated by GCOT: गरीब-गरजूंना केलेल्या मदतीसाठी सोनू सूद याचा 'ग्रामोदय बंधू मित्र पुरस्कार' देवून सन्मान)
Sonu Sood Tweet:
कोरोना व्हायरस संकट काळात (Coronavirus Pandemic) बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने स्थरांतरीत मजूरांना केलेली मदत न विसरता येण्यासारखी आहे. त्याच्या या सेवेचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक झाले. मात्र त्यानंतरही त्याने मदतकार्य थांबवले नाही. पूरपरिस्थिती अडकलेल्या लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना त्याने मदतीचा हात पुढे केला. तसंच मदतकार्य अखंड सुरु राहणार असल्याचेही आश्वासन त्याने दिले आहे.
कोविड-19 संकटामुळे यंदा दुर्गा पूजा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तरी देखील सणाचा उत्साह कमी झालेला नाही. कोरोना संकटामुळे सजावट, देवीच्या मुर्ती यांची नवी कल्पना लोकांना मिळाली आहे. कोलकाता मधील Barisha Club Durga Pujo मंडळात यंदा वेगळ्या दुर्गा मुर्तीची स्थापना झाली आहे. मुलांना घेऊन पायी प्रवास करणारी स्थलांतरीत मजूर महिला दुर्गेच्या रुपात पाहायला मिळणार आहे.