'My Love' म्हणत KL Rahul ने दिल्या 'Athiya Shetty'ला रोमँटिक शुभेच्छा, पाहा पोस्ट

क्रिकेटर केएल राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अथिया शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

KL rahul & Athiya Shetty (Photo Credit - Instagram)

बॉलीवूड (Bollywood) आणि क्रिकेट (Cricket) हे नाते खूप जुने आहे. बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी क्रिकेटर्सच्या जवळ असल्याच्या बातम्या येत असतात. काही अफवा खऱ्या आहेत, परंतु अलीकडेच भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्यातील नातेसंबंधाच्या बातम्यांना अधिकृतपणे पुर्णविराम मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून राहुल आणि अथियाबद्दल अनेक बातम्या मीडियामध्ये येत होत्या. दोघांना एकत्र पाहिले गेले आहे पण या दोघांनी कधीच आपल्या नात्याबद्दल बोलले नाही, मात्र क्रिकेटर केएल राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अथिया शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली. (हे ही वाचा Happy Birthday Virat Kohli: अनुष्काने विराटला दिल्या खास शुभेच्छा...)

शुक्रवारी, 5 नोव्हेंबर रोजी सुनील शेट्टीची मुलगी अथियाचा वाढदिवस होता आणि यावेळी ती दुबईमध्ये उपस्थित होती. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भारत आणि स्कॉटलंड यांच्यात सामनाही झाला होता. अथिया संपूर्ण सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित होती आणि भारतीय संघासह केएल राहुलला चिअर करत होती. राहुलने सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर दोघांनी मिळून अथियाचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

 

राहुलच्या या पोस्टवर अथिया शेट्टीनेही प्रतिक्रिया दिली असून, तिने व्हाइट हार्ट आणि ग्लोबल वर्ल्डचे इमोजी टाकले आहेत. इतकेच नाही तर अनुष्का शर्मानेही या पोस्टवर हार्ट इमोजीसह कमेंट केली आहे. त्याचा सहकारी क्रिकेटर हार्दिक पांड्या, सानिया मिर्झा सयामी खेर, अहान शेट्टी यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे.