Lockdown मुळे त्रासलेल्या रोजंदारी कामगारांच्या मदतीसाठी सरसावली कैटरीना कैफ; कामगारांना अन्न, स्वच्छता सुविधा पुरवणाऱ्या De’haat Foundation ला पाठिंबा

पीएम केअर्समध्ये आर्थिक योगदान दिल्यानंतर रोजंदारी कामगारांना मदत करण्याची तिची इच्छा आहे. यासाठी तिने डीहॅट फॉऊंडेशनसह भागीदारी केली आहे.

Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कोरोनाचा देशाभोवती विळखा वाढत असल्याने संकट अधिक तीव्र होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी अभिनेत्री कैटरीना कैफ (Katrina Kaif) देखील पुढे सरसावली आहे. पीएम केअर्समध्ये आर्थिक योगदान दिल्यानंतर रोजंदारी कामगारांना मदत करण्याची तिची इच्छा आहे. यासाठी तिने डीहॅट फॉऊंडेशनला (De’haat Foundation) पाठिंबा दर्शवला आहे. गरिब गरजूंना अन्न, स्वच्छता सुविधा पुरवणाऱ्या या संस्थेला कैटरीनाने मदत केली आहे.

याची माहिती कैतरिना हिने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. पोस्टमध्ये कैतरिनाने लिहिले की, "हा आपल्यासाठी कठीण काळ आहे. मात्र काही लोक असे आहेत ज्यांना इतरांच्या तुलनेत अधिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील रोजंदारी कामगारांना मदत करण्यासाठी मी डीहॅट फॉऊंडेशनला पाठिंबा देत आहे. या संस्थेची जोडले जाणे ही अभिमानाची गोष्ट आहे." (रोहित शेट्टी याने मुंबई पोलिसांसाठी खुली केली 8 हॉटेल्स; Mumbai Police नी देखील मानले आभार!)

कैतरिना कैफ पोस्ट:

 

View this post on Instagram

 

We have been associated with the De’Haat Foundation, from the very beginning of our #KareWithKayBeauty initiative. We are very proud to be supporting the community of the De’haat foundation by providing the people of the Bandhara District in Maharashtra, with food and sanitary essentials during this Pandemic If you wish to join this initiative & contribute head on to our link in bio. #KayBeauty #KayByKatrina #DonateForaCause #InItTogether

A post shared by Kay Beauty By Katrina (@kaybykatrina) on

डीहॉर्ट फॉऊंडेशनतर्फे रोजंदारी कामगार आणि त्यांच्या परिवाराला अन्न आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे कैतरिनाने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसंच या कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत, असेही ती म्हणाली.

कोरोना व्हायरसच्या या गंभीर परिस्थितीत अनेक सेलिब्रिटी सामाजिक भान जपत मदतीसाठी पुढे येत आहेत. तसंच आर्थिक मदतीसह आवाहन करत नागरिकांपर्यंत योग्य तो संदेश पोहचवत आहे.